राज्यातील गटसचिवांना 20 महिन्यांनंतर पगार मिळणार?; रोहित पवारांची सहकार मंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा
राज्यातील सुमारे 21 हजार विकास सोसायट्यांच्या गटसचिवांचा गेल्या 15 ते 20 महिन्यांच्या पगाराचा प्रश्न निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. (rohit pawar met balasaheb patil, discuss on various issue)
मुंबई: राज्यातील सुमारे 21 हजार विकास सोसायट्यांच्या गटसचिवांचा गेल्या 15 ते 20 महिन्यांच्या पगाराचा प्रश्न निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील गटसचिवांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून काल यासंदर्भात मुंबईत बैठक झाली, त्यावेळी सहकारमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. (rohit pawar met balasaheb patil, discuss on various issue)
सहकार मंत्री बाळसाहेब पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला सहकारमंत्र्यांसह राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सहकार आयुक्त, आमदार रोहित पवार यांच्यासह इतरही काही आमदार तसेच ‘महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समिती’चे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात ज्या सेवा सोसायट्यांचा महत्त्वाचा वाटा असतो त्यांचा प्रशासकीय कारभार गटसचिव बघतात. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यामध्ये या गट सचिवांचे मोठे योगदान आहे. कोविडच्या संसर्गतही शेतकऱ्यांना सेवा देण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे सुरूच होते. मात्र त्यांचे सेवा आणि वेतनविषयक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, याकडे रोहित पवार यांनी पाटील यांचं लक्ष वेधलं.
लोकसेवकांचा दर्जा द्या
या गट सचिवांना काही जिल्ह्यांमध्ये तर त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते तर काही जिल्ह्यांमध्ये अगदी 15-20 महिन्यांपासू वेतन मिळालेले नाही. राज्यातील सुमारे 21 हजार विकास सोसायट्यांच्या गटसचिवांचा हा प्रश्न आहे. गटसचिवांना लोकसेवकाचा दर्जा देण्यात यावा, ग्रामसेवकासमान वेतनश्रेणी लागू करावी, समान काम-समान वेतन, सेवा नियम लागू करणे अशा अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, असंही पवारांनी या बैठकीत स्पष्ट केलं. या सर्व विषयांवर काल झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
दोन आठवड्यानंतर अंतिम बैठक
गट सचिवांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विषयावर येत्या दोन आठवड्यात आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन आठवड्यानंतर होणाऱ्या बैठकीत गटसचिवांच्या मागण्यांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे ही बैठक झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. (rohit pawar met balasaheb patil, discuss on various issue)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 September 2021 https://t.co/bgMLl72ffY #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 3, 2021
संबंधित बातम्या:
महापालिकेच्या तरण तलावच्या खासगीकरणाचा घाट, नितेश राणे यांची चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्रं
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू; संजय राऊतांना विश्वास
आमच्यासाठी तो कायम मॉन्टीच होता, मनसे नेत्याने जागवल्या सिद्धार्थसोबतच्या बालपणीच्या आठवणी
(rohit pawar met balasaheb patil, discuss on various issue)