Rohit Pawar : अजित पवारांच्या बोलण्याने भाजपची अडचण झाली असती, यांना सदबुद्धी प्राप्त होईल, हीच अपेक्षा, रोहित पवारांची खोचक फेसबुक पोस्ट
रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात. बेधडक बोलणाऱ्या अजित पवारांमुळे भाजप नेत्यांची अडचण झाली असती, तसेच आता भाजप नेत्यांना किमान तुकोबाराय यांचं दर्शन घेतल्यावर तरी सदबुद्धी मिळावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पुणे : पंतप्रधान मोदी (Pm Modi) पुण्यात येऊन गेले खरं मात्र या कार्यक्रमात अजित पवारच (Ajit Pawar) जास्त चर्तेत राहिली. अजित पवारांना बोलू दिले नाही म्हणत राष्ट्रवादी नेत्यांनी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी आता भाजपवर (BJP) हल्लाबोल चढवला आहे. हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. तर दुसरीकडे भाजप नेतेही राष्ट्रवादीला त्याच भाषेत उत्तर देत आहे. मात्र राज्यभर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवा यांनीही यावरूनच एक खोचक पोस्ट केली आहे. रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात. बेधडक बोलणाऱ्या अजित पवारांमुळे भाजप नेत्यांची अडचण झाली असती, तसेच आता भाजप नेत्यांना किमान तुकोबाराय यांचं दर्शन घेतल्यावर तरी सदबुद्धी मिळावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
“छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही.
वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!”
रोहित पवारांचा फेसबुकवरून हल्लाबोल
ध्यात्मिक क्षेत्रातही राजकारण
भाजपकडून आता अध्यात्मिक क्षेत्रातही राजकारण केलं जातंय. अजितदादांना बोलू न देणं, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके यांना निमंत्रण नाही. हे सर्व भाजपकडून अध्यात्मात राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपचा हा डाव आम्ही यशस्वी होवू देणार नाही. भाजपकडून सुरु असलेल्या या राजकारणाचा निषेध आहे म्हणत राष्ट्रवादीच्या महिला विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी भाजपला इशारा दिला आहे.
राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आंदोलनं
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला मात्र आता त्या सोहळ्यात अजित पवार यांना भाषण करू न दिल्याल्या वादाला तोड़ फुटले आहे. आता देहू राष्ट्रवादी कांग्रेसने देहुच्या मुख्य चौकात आंदोलन करून आचार्य तुषार भोसले यांचा निषेध नोंदविण्यात आला. आचार्य तुषार भोसले यांच्याकडे सर्व स्टेज आणि प्रोटोकॉल व्यवस्था असल्यामुळे त्यांनी जानून बुजून अजित पवार यांना भाषण करू न दिल्याचा आरोप राष्ट्रवादी कडून करण्यात आला आहे.