पदोन्नतीतील आरक्षणासाठी रिपाइं रस्ता रोको; 7 जूनपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

पदोन्नतीतील आरक्षणासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने आज राज्यभर आंदोलने केली. (RPI agitation against maha vikas aghadi for reservation in promotion)

पदोन्नतीतील आरक्षणासाठी रिपाइं रस्ता रोको; 7 जूनपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
RPI
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 6:23 PM

मुंबई: पदोन्नतीतील आरक्षणासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने आज राज्यभर आंदोलने केली. रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तर येत्या 7 जूनपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही रिपाइंने दिला आहे. (RPI agitation against maha vikas aghadi for reservation in promotion)

राज्य सरकारने पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा या मागणीसाठी रिपाइं कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. मुंबईसह राज्यभरात रिपाइं कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने करत निषेध नोंदवला. मुंबईत ताडदेव सर्कल येथे पदोन्नतीमध्ये अरक्षणाच्या मागणीसाठी रिपाइंचे सोना कांबळे, नामदेव सरवदे, आशा लांडगे, चंद्रकांत कसबे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. चेंबूरमध्ये युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील शिरसाट, सिद्धार्थ कासारे, रवी सावंत यांनी आंदोलन केले. संजय डोळसे यांच्या नेतृत्वात अणुशक्ती नगर येथे तर सिद्धार्थ कॉलनी येथे रवी गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. गोरेगाव आरे कॉलनी सिग्नल येथे रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात तसेच रमेश पाईकराव, फुलचंद कांबळे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आठवलेंच्या सूचना

राज्यात सोलापूर येथे रिपाइंचे राज्य सरचिटणीस राजा सरवदे, कोल्हापूर येथे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकाने त्वरित घ्यावा या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यलयावर 1 जून ते 7 जून पर्यंत रिपाइंने आंदोलन सप्ताह आयोजित केला आहे. कोरोना प्रसाराचे नियम पाळून आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे आंदोलन करावे, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. (RPI agitation against maha vikas aghadi for reservation in promotion)

संबंधित बातम्या:

‘ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात निवडणूका नको’, मंत्री विजय वडेट्टीवारांची भूमिका

पदोन्नती कोट्यातील सर्व जागा भरणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

तो जीआर रद्द होणार, पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा निघणार; नितीन राऊत यांची माहिती

(RPI agitation against maha vikas aghadi for reservation in promotion)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.