RSS-BJP : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संघ’ दक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

RSS-BJP : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
भाजपचं संघ दक्ष
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 3:02 PM

लोकसभेतील हाराकिरीमुळे भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जिव्हाळा जपला आहे. संघाशी जुळवून घेण्यात भाजपने पुढाकार घेतला आहे. दिल्लीत यापूर्वी बैठक झाली. त्यात संघाने अनेक बाबतीत मार्गदर्शन केले होते. त्यानंतर काही धोरणात्मक बदल पाहायला मिळाले. लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे भाजपची मुंबईसह महाराष्ट्रात पिछेहाट झाली होती. विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार असल्याचे समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संघ दक्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आमदारांची बैठक नुकतीच झाली. मुंबईत ३६ मतदार संघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढणार असल्याचे समोर येत आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सहभागी असेल. विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत काय ठरलं?

लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे भाजपची मुंबईसह महाराष्ट्रात पिछेहाट झाली होती. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये संघानं भाजपला एक हाती मदत केली. याच मदतीच्या जोरावर भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांचा आकडा ३१ वरून ८२ पर्यंत वाढला.

संघाच्या मदतीमुळे भाजपला मुंबईत २०१९च्या लोकसभेमध्ये ३ तर महायुतीला ६ जागांवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीतही संघामुळे भाजपनं एकट्याच्या जीवावर १६ जागा जिंकल्या होत्या.

मात्र उर्दू भवनच्या मुद्द्यावरून टोकाचा विरोध असताना ही मुंबईत यामिनी जाधव यांना दिलेल्या उमेदवारीमुळे संघात कमालीची नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत संघाने याच नाराजीमुळे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीला मुंबईत अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.

लोकसभा निवडणुकीत मुंबईत ३ पैकी २ हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपनं संघासमोर शरणागती पत्करली. येत्या निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असलेल्या विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी छुप्या व उघड पद्धतीनं काम करणार आहेत.

उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही; मात्र त्याचवेळी अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही, याचीही खात्री संघाने भाजपला दिल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.