अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे भाजपचे पानिपत, संघाच्या ऑर्गेनाइजरमधील लेखातून भाजपला खडेबोल

rss Organiser ajit pawar eknath shinde devendra fadnavis: ऑर्गेनायजरमधून भाजपला आरसा दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत जे काम केले आहे. त्याचा हाल हवाला दिला आहे. आयारामगयारामांना घेऊन भाजपने राज्यातील वर्चस्व कमी केले आहे. भाजप हवेत वावरत होती. जमिनीवरचे कार्यकर्ते अन् संघाशी संपर्क साधला गेला नाही.

अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे भाजपचे पानिपत, संघाच्या ऑर्गेनाइजरमधील लेखातून भाजपला खडेबोल
अजित पवार यांना महायुतीत घेतल्याबद्दल ऑर्गेनायजरमधून प्रश्न उपस्थित केला आहे.
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 10:51 AM

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट झाली. या राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही. भाजपच्या या पराभवाचे पक्षीय पातळीवर विश्लेषण केले जात आहे. त्याचवेळी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) भाजपने महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचे नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गेनायजरमधून सुनावण्यात आले आहे. आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे.

काय म्हटले आहे ऑर्गेनायजरमधून

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता म्हटले की, भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षड्यंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेले. भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही. महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली आहे.

अजितदादांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी केली

अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे. भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्वत कळते या मोठ्या भ्रमात राहिले आहेत. भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले.

हे सुद्धा वाचा

संघाशी संपर्क केला नाही

ऑर्गेनायजरमधून भाजपला आरसा दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत जे काम केले आहे. त्याचा हाल हवाला दिला आहे. आयारामगयारामांना घेऊन भाजपने राज्यातील वर्चस्व कमी केले आहे. भाजप हवेत वावरत होती. जमिनीवरचे कार्यकर्ते अन् संघाशी संपर्क साधला गेला नाही. मोदींचा चेहरासमोर ठेवून निवडणूक समोर ठेवून निवडणूक लढली गेली ही चूक आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.