नातवंडांना गोवर-रुबेला लसीकरण, आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक संदेश

मुंबई : राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी बालकांना लस देण्यात आली आहे. आज आपल्या दोन नातवंडांना ही लस देऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कृतीतून सकारात्मक संदेश दिला आहे. विलेपार्ले येथील सीएनएमएस शाळेत आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण सत्रात आरोग्यमंत्री हजर राहिले आणि त्यांनी या शाळेत शिकत असलेल्या त्यांच्या नातवंडांना […]

नातवंडांना गोवर-रुबेला लसीकरण, आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक संदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी बालकांना लस देण्यात आली आहे. आज आपल्या दोन नातवंडांना ही लस देऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कृतीतून सकारात्मक संदेश दिला आहे. विलेपार्ले येथील सीएनएमएस शाळेत आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण सत्रात आरोग्यमंत्री हजर राहिले आणि त्यांनी या शाळेत शिकत असलेल्या त्यांच्या नातवंडांना लसीकरण करुन घेतले.

राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. सहा आठवड्यांच्या या लसीकरण मोहिमेत सध्या शाळांमध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांना लस देण्यात येत आहे. दररोज राज्यभरात साधारणत: 10 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत सुमारे दीड कोटी बालकांना लसीकरण करण्यात आले असून राज्याचे सुमारे 45 टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या लसीकरण मोहिमेसंदर्भात काही ठिकाणी पालकांच्या मनात संभ्रम असून लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून पालकांनी लसीकरण न करण्याची भूमिका शाळांना कळविल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगतानाच आपल्या नातवंडांनाही ही लस देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या मोहिमेच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार आज विलेपार्ले येथील सीएनएमएस शाळेमध्ये मुंबई महापालिकेमार्फत लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत स्वत: उपस्थित राहिले. आरोग्यमंत्र्यांची नात रिया (वय वर्ष 7) ही या शाळेत इयत्ता पहिलीत शिकते आणि नातू रोहित (वय वर्ष 4) छोटा शिशू गटात शिकतो. आज सकाळी 11 च्या सुमारास या दोघा नातवंडांना आरोग्यमंत्री असलेल्या आजोबांच्या उपस्थितीत लस देण्यात आली. दोघा नातवंडांनी आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून लस टोचून घेतली. यावेळी आरोग्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. स्वप्नेश आणि स्नुषा अनुष्का उपस्थित होते.

पालकांनी गोवर-रुबेला लसीबाबत कुठलाही गैरसमज न करता आपल्या मुलांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.