आरोपीला सर्व खरं खरं सांगायला लावणारी वैद्यकीय चाचणी काय असते?
एखाद्या व्यक्ती किंवा आरोपी या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर जी वैद्यकीय चाचणी होते त्याला न्यायालयीन वैद्यकीय चाचणी म्हणतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि मी गोळीबार केला अशी कबुली शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिली. त्याची न्यायवैद्यक चाचणी घेण्यात आली.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि मी गोळीबार केला अशी कबुली शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिली. त्याची न्यायवैद्यक चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीत त्याने हा खुलासा केलाय, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका अहवालाद्वारे विशेष न्यायालयात दिली. मात्र न्यायवैद्यक चाचणीचे निकष किंवा रिपोर्ट हे कुठल्याही केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करता येतात आणि त्या आधारे आरोपीला शिक्षा होऊ शकते.
काय आहे न्यायालयीन वैद्यकीय चाचणी?
एखाद्या व्यक्ती किंवा आरोपी या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर जी वैद्यकीय चाचणी होते त्याला न्यायालयीन वैद्यकीय चाचणी म्हणतात.
टीममध्ये कोण कोण असतो?
न्यायलयीन वैद्यकीय चाचणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार एक समिती नियुक्त केली जाते. या समितीमध्ये तज्ञ डॉक्टर्स असतात. त्याचबरोबर कमिटीमध्ये एक मॉनिटरिंग अथोरिटी असते, ज्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सचे प्रतिनिधी असतात आणि ही अथोरिटी डॉक्टरांसोबत काम करते.
ज्या व्यक्तीची चाचणी करायची आहे, त्या संबंधित व्यक्तीची सहमतीही पाहिली जाते. याची नोंद न्यायालयात घेतली जाते. कारण, ही चाचणी जबरदस्तीने केली असा आरोप अनेकदा केला जातो आणि त्याचा फायदा आरोपीला मिळतो. म्हणूनच आता सहमतीही महत्त्वाची मानली जाते. विश्वासपूर्ण वातावरण निर्माण केलं जातं आणि त्यामध्ये आरोपी सर्व माहिती देतो.
दोन प्रकारची चाचणी
या चाचणीचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे नॉर्मल स्टीम्युलेशन.. यामध्ये विश्वासपूर्ण वातावरणात आरोपी सर्व घडलेला प्रकार स्वतः कबूल करतो.
दुसरा प्रकार आहे इंजक्टेबल स्टीम्युलेशन.. एखादा आरोपी जेव्हा खरं सांगण्यासाठी तयार नसतो, तेव्हा हा प्रकार वापरला जातो. न्यायलयीन वैद्यकीय चाचणीत आरोपी किंवा संबंधित व्यक्तीला उलटतपासणीची मुभा असते. या चाचणीचा अहवाल साक्ष म्हणून ग्राह्य धरला जातो.