मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने टेन्शन वाढले, त्यानंतर वाझेंनी काय केलं?; वाचा, सविस्तर

| Updated on: Mar 27, 2021 | 11:08 AM

मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. (Sachin Vaze destroyed five cellphones after Mansukh Hiren's body found)

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने टेन्शन वाढले, त्यानंतर वाझेंनी काय केलं?; वाचा, सविस्तर
sachin waze
Follow us on

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हिरेन यांचा मृतदेह भरतीमुळे परत किनाऱ्याला परत येणार नाही, या भ्रमात सचिन वाझे होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाझेंचं टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे वाझेंनी तात्काळ आपल्याकडील पाचही मोबाईल नष्ट केले होते, अशी धक्कादायक माहिती वाझेंनी एनआयएला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Sachin Vaze destroyed five cellphones after Mansukh Hiren’s body found)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यात एनआयएच्या हवाल्याने ही धक्कादायक माहिती दिली आहे. हिरेन आणि अँटालिया प्रकरणातील कारस्थान उघड करण्यासाठी एनआयएने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी वाझेंच्या सर्व मोबाईलमधील डाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही घटनांमध्ये वाझेंचे फोन हा महत्त्वाचा पुरावा असून त्याचा डेटा येताच वाझेंची सर्व पोलखोल उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनआयएने सध्या वाझेंच्या फोनचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतानाच वाझेंना एनआयएला ही माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हॉटेलचं बिल व्यापाऱ्याच्या माथी

दरम्यान, एनआयएला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी करायची आहे, ज्याने दक्षिण मुंबईतील एका व्यवसायिकाला फोन करुन वाझेंच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील वास्तव्याचं 13 लाखांची बिल भरण्यास सांगितलं होतं. व्यवसायिकाने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, एका ज्वेलरने 50 ते 60 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आपण केली होती. जर आपण हॉटेलचं बिल भरलं तर सचिन वाझे हे पैसे परत मिळवण्यात मदत करतील असं अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं होतं.

वाझेंच्या कोठडीत वाढ

वाझेंना यापूर्वी एनआयएने 14 मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर वाझेंची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेंच्या कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

एनआयएची कोर्टाला धक्कादायक माहिती

यावेळी एनआयएने कोर्टाला आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली होती. (Sachin Vaze destroyed five cellphones after Mansukh Hiren’s body found)

 

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

(Sachin Vaze destroyed five cellphones after Mansukh Hiren’s body found)