Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला

एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. | ATS sachin Vaze

अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला
25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते.
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:29 AM

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके सापडल्यानंतर प्रोटोकॉलचे पालन न केल्याच्या कारणावरुन सचिन वाझे (Sachin Vaze) आणि राज्य दहशवातविरोधी पथकाच्या (ATS) एका अधिकाऱ्यामध्ये खटका उडाल्याची माहिती समोर आली आहे. या वादाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आली होती. (verbal encounter between sachin Vaze and ATS officer outside ambani residence)

सूत्रांच्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला, साहेबांना गाडी दाखव, असे फर्मान सोडले. सचिन वाझे यांच्या या वर्तणुकीमुळे संबंधित एटीएस अधिकारी प्रचंड संतापला होता. सचिन वाझे यांनी पोलिसांच्या प्रोटोकॉलचे पालन केले नाही, अशी तक्रारही त्याने वरिष्ठांना केल्याचे समजते.

तपासाच्या नावाखाली सचिन वाझेंनी पुरावे नष्ट केले

पोलीस तपासाच्या नावाखाली सचिन वाझे यांनी अनेक पुरावे नष्ट केल्याची माहिती आता समोर आली आहे. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन प्रकरणात अनेक मुद्देमाल जप्त केला. मात्र, या गोष्टी त्यांनी पोलीस रेकॉर्डवर ठेवल्याच नाहीत, अशी माहिती आता पुढे आली आहे.

नंबरप्लेट तयार करण्यात आलेल्या दुकानाचा मालक म्हणतो…

मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असून आता नवीन माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराशेजारी मिळाली ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. या स्कॉर्पिओ गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सद्गुरु कार डेकोरेटरच्या दुकानातुन बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवीन तलरेजा असे या दुकानाच्या मालकाचे नाव आहे. त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, मनसुख हिरेन माझ्याकडून नंबर प्लेट बनवण्याची ऑर्डर देत असे आणि मी त्या पद्धतीने त्यांना नंबर प्लेट बनून दिल्या. मनसुख हिरेन हेदेखील कार डेकोरेशनच्या व्यवसायात होते. त्यामुळे त्यांना या नंबरप्लेटस लागत असतील, असे मला वाटले.

माझ्या दुकानात दोनवेळा पोलीस आले, एकदा सचिन वाझे स्वतः आले सोबत चार पोलीस होते, नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा टीम आली, 5 जण होते पण सचिन वाझे नव्हते. त्या टीमने माझी डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज अशा सर्व गोष्टी नेल्या. आता माझ्याकडे कोणताही डेटा नाही, असे नवीन तलरेजा यांनी सांगितले.

वाझेंच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही गायब

सचिन वाझे यांच्या ठाणे येथील घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज 2 मार्च रोजीच मुंबई पोलिसांनी काढून नेल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीत जवळपास 51 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज असणारा डीव्हीआर पोलिसांनी नेला, अशी माहिती येथील सुरक्षारक्षकांनी दिली. हा डिव्हीआर नेमका कोणत्या पोलिसांनी नेला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता याप्रकरणातील गुढ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.