AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze Arrested by NIA: अखेर API सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या झडतीनंतर बेड्या

Sachin Vaze | मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आलीय.

Sachin Vaze Arrested by NIA: अखेर API सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या झडतीनंतर बेड्या
सचिन वाझे
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 1:18 PM

मुंबईः मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आलीय. शनिवार (13 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर 13 तासांच्या चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आलीय. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. अखेर NIA च्या प्रदीर्घ चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आलीय. (Sachin Vaze  arrested by NIA after 13 hours of interrogation)

सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात.  त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेत. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडालीय.

स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातही वाझेंवर आरोप

सचिन वाझेंवर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी देखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलंय. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतेय. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यावर अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला

विशेष म्हणजे एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze ) यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) फेटाळला होता. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर एनआयएनं त्यांना अटक केलीय. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. या प्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.

कोर्टाने काय म्हटलंय? 

सचिन वाझे यांच्यावर अटकेची तलवार आहे. जामीन फेटाळताना कोर्टाने स्पष्ट म्हटलंय, “त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे.” सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला. ज्याला कोर्टाने नकार दिला होता.

NIA च्या आधी सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशी

विशेष म्हणजे NIA च्या आधीच 12 तारखेला एटीएसनंही सचिन वाझे यांची चौकशी केली होती. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली होती. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली होती. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.

सचिन वाझे यांची बदली

सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

इतर बातम्या :

एटीएसने मनसुख यांच्या वकिलाचा जबाब नोंदवला, के. एच, गिरींकडून वाझेंबाबत मोठे गौप्यस्फोट

maharashtra state corona update | राज्यात तब्बल 15 हजार नवे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं कारण समोर?

(Sachin Vaze has has been arrested by NIA after 13 hous of interrogation)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.