दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत मंत्रालयाकडे; दूध दरवाढीसाठी अनोखं आंदोलन

कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं आहे. त्यामुळे दूध दरवाढ मिळावी म्हणून रयत क्रांती संघटनेने आज अनोखं आंदोलन केलं.

दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत मंत्रालयाकडे; दूध दरवाढीसाठी अनोखं आंदोलन
sadabhau khot
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 2:24 PM

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं आहे. त्यामुळे दूध दरवाढ मिळावी म्हणून रयत क्रांती संघटनेने आज अनोखं आंदोलन केलं. संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वत: दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन हे आंदोलन केलं. खोत आणि आंदोलक दुधाची कॅन खांद्यावर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने आल्याने पोलिसांची एकच पळापळ झाली. यावेळी खोत यांचा मोर्चा मध्येच अडवण्यात आला. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला. (sadabhau khot protest against milk price fall in maharashtra)

आज सकाळी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि आंदोलकांनी दुधाच्या कॅन खांद्यावर घेऊन मंत्रालयाकडे निघाले. यावेळी ‘दुधापेक्षा पाणी महाग, आघाडी सरकारला कधी येणार जाग’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे मंत्रालय परिसर दणाणून गेला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खोत यांचा मोर्चा मध्येच अडवला. यावेळी खोत यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी खोत यांनी दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सचिवांनी आश्वासन दिल्याचं खोत म्हणाले.

खासगी कंपन्यांवर कारवाई करा

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला 18 ते 20 रुपयांपर्यंत प्रति लिटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार 3/5 फॅट व 8/5 एसएनएफ नुसार किमान 25 रुपये प्रति लिटर दर देणे आवश्यक आहे, परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्था व खाजगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकंच नाही तर खाजगी दूध संस्थावर व खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे, असं खोत म्हणाले.

दुधालाही एमएसपी किंवा एफआरपी असावी

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार 70/30 चा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे दूध उत्पादकांसाठी किमान 85/15 चा फॉर्म्युला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघामध्ये 81/19 चा फॉर्म्युला कार्यरत आहे. 1966-67 नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञान युक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर हे आमचे गायी ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत, या जातींच्या गायींचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. (sadabhau khot protest against milk price fall in maharashtra)

संबंधित बातम्या:

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र

ढगांच्या गर्दीत देवीचं दर्शन, निसर्गाचा आविष्कार जयदेव ठाकरेंच्या पत्नीच्या कॅमेऱ्यात कैद

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील: चंद्रकांत पाटील

(sadabhau khot protest against milk price fall in maharashtra)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.