Salman Khan | सलमान खानला चावलेल्या सापासोबत काय केलं? सलीम खान यांनी सांगितलं की…

लमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Salim Khan) यांनी सलमान खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सलमान खानला साप चावल्यानंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर सलीम खान यांनी नेमका सलमान खानला साप कसा चावला, याचीही माहिती दिली आहे.

Salman Khan | सलमान खानला चावलेल्या सापासोबत काय केलं? सलीम खान यांनी सांगितलं की...
सलीम खान आणि सलमान खान
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 8:42 PM

पनवेल : सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Salim Khan) यांनी सलमान खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सलमान खानला साप चावल्यानंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर सलीम खान यांनी नेमका सलमान खानला साप कसा चावला, याचीही माहिती दिली आहे. शनिवारी रात्री सलमान खानला सर्पदंश (Snake Bite) झाला होता. त्यानंतर त्याला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात (MSG Hospital) काही तास उपचारासाठी थांबावं लागलं होतं.

एमजीएममधील डॉक्टरांनी काही तास सलमान खानला अंडर ऑब्झरवेशन (Under Observation) ठेवलं होतं. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पाहून तीन तासांच्या निरीक्षणानंतर सलमान खानला डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला होता. दरम्यान, आता सलमान खान याला ज्या सापानं दंश केला होता, त्यालाही पकडण्यात आलं आहे. हा साप विषारी होता का, याबाबत आता एमजीएममधील तज्ज्ञांकडून शोध घेतला जातो आहे.

काय म्हणाले सलीम खान?

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या सर्पदंशाच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमका सलमानला साप चावला कसा, याची माहिती देताना म्हटलंय की,…

सलमान खान आपल्या बेडरुममध्ये होता. अचानक त्याचा हात दुखू लागला. हाताला होत असलेल्या वेदना सर्वसामान्य नव्हत्या. तिथे एक साप मोकळी जागा असल्यानं आत असल्याचं दिसलं. सापानं दंश केल्याचं कळताच आम्ही सलमानला लगेचच रुग्णालयात नेलं. आता सलमान खानची प्रकृती स्थिर आहे.

जा भाई, तू भी चला जा…

दरम्यान, आपल्या विनोदी शैलीत सलीम खान यांनी पुढे प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आम्हाला सापाचा कोणताही त्रास नाहीये. सलमान आता ठीक आहे. सुरक्षित आहे. आम्हीही त्या बिचाऱ्या सापाला जाऊ दिलंय. त्या म्हटलंय की.. जा भाई तू भी चला जा!

दरम्यान, ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलाय, त्या पनवेलमधील फार्महाऊसचा परिसर हा झाडाझुडपात आहे. त्यामुळे तिथे किडे, सरपटणारे प्राणी, आणि विंचू, साप असणं स्वाभाविक असल्याचंही सलीम खान यांनी म्हटलं. त्यामुळे अशाप्रकारच्या छोट्या-मोठ्या गोष्टी या इथं होतच असतात, त्याचं नवल वाटावं, असं काही घडलेलं नाही, असंही ते म्हणालेत.

वाढदिवसाच्या तयारीत सर्पदंशाचा खोडा

उद्या सलमान खानचा वाढदिवस आहे. त्याआधी घडलेल्या या घटनेमुळे सलमान खानच्या बर्थडे पार्टीच्या तयारीलाही खोडा बसलाय. सकाळपासूनच डॉक्टर, सर्पमित्र या सगळ्यांच्या गडबडीत सलमान खानच्या बर्थडे पार्टीचं नियोजन कोलमडलं असण्याची शक्यता आहे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाईजानच्या चाहत्यांना सलमानची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळल्यानंतर मोठा दिलासा मिळालाय. सलमान खान उद्या आपला 56वा वाढदिवस साजरा करणार आहे.

संबंधित बातम्या –

Video | Salman Khan | सलमानला चावलेला साप अखेर पकडला, साप अजूनही जिवंत, विषारी होता का?

Salman Khan | चावला साप, आठवला काळवीट, मीमर्स म्हणाले, ‘सलमानला चावलेला साप आयसीयूत!’

Salaman Khan| सलमान खानला कोणत्या प्रजातीचा साप चावला?, हा साप चावल्यास धोका किती?, काय करावे आणि काय करू नये?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.