संभाजी भिडे पुन्हा बरळले, सभागृहात विरोधक आक्रमक, अटकेची मागणी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थापकचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत.
मुंबई | 28 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. संभाजी भिडे यांनी यावेळी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष विधानसभेत आज चांगलाच आक्रमक झाला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. संभाजी भिडे यांच्यावर योग्य ती कारवाई करु, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.
संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. संभाजी भिडे यांनी यावेळी थेट महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आता काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.