सक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांनासोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पुन्हा एकदा खासदार संभाजी छत्रपती यांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवतन दिलं आहे.

सक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांनासोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन
prakash ambedkar
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 5:56 PM

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खासदार संभाजी छत्रपती यांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवतन दिलं आहे. संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावं. राज सत्तेशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. (sambhaji chhatrapati should come active politics, says prakash ambedkar)

प्रकाश आंबेडकर यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणात यावं. त्याशिवाय हा मुद्दा निकाली निघणार नाही. राज सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणे शक्य नाही. आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांना सोबत घ्यावे. आम्हीही तुमच्यासोबत येऊ, असं आंबेडकर म्हणाले.

वंचितला सोबत घेणं दिल्लीतील नेत्यांना मान्य आहे का?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित आघाडीसोबत आघाडी करण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही आंबेडकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले वंचितला सोबत घेण्याबद्दल बोलत आहेत. पण हे त्यांच्या दिल्लीतील नेत्यांना मान्य आहे का?; त्यांनी 500 कोटींचा आरोप लोकसभेत केला, आता 500 कोटींमधील 100 कोटी आधी आम्हाला द्यावे. आम्हाला तेवढेच पुरेसे आहेत, असं सांगतानाच आम्हाला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा अनुभव चांगला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात नक्की चाललंय काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देणग्या आणि मूर्त्यांचे काय झाले?

अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं. राम मंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी व्हावी. त्याचसोबत यापूर्वी देखील लोकांनी ज्या सोन्या-चांदीच्या मूर्ती दिल्या होत्या, त्याच काय झालं? याची ही चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. शिवसेनेने जमिनीसोबत पूर्वीच्या देणग्यांचे काय झाले हे ही भाजपला विचारावे, असंही ते म्हणाले.

पालिका निवडणुका लढवणार

यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत गंभीर असल्याचं सांगितलं. तसेच महापालिका निवडणुकीसाठी व्युवहरचना आखण्यास सुरुवात करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकांमध्ये वंचित कुणाला भारी पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sambhaji chhatrapati should come active politics, says prakash ambedkar)

संबंधित बातम्या:

VIDEO: 5 जुलैपर्यंत 6 मागण्या मान्य करा, उद्रेक झाल्यास…; उदयनराजेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम

2024 चं शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं? कुणाची गोची, कुणाला संधी? काय असू शकतं सत्तेचं गणित? वाचा सविस्तर

VIDEO: शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार

(sambhaji chhatrapati should come active politics, says prakash ambedkar)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.