मराठा समाज मागासवर्गीय होत नाहीत, तोपर्यंत ओबीसींमध्ये येऊच शकत नाही: प्रकाश शेंडगे

| Updated on: May 29, 2021 | 1:50 PM

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीत नवा प्रवर्ग तयार करण्याच्या शक्यतेविषयी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी सुतोवाच केलं होतं. (sambhaji chhatrapati should speak on dhangar reservation, says prakash shendge)

मराठा समाज मागासवर्गीय होत नाहीत, तोपर्यंत ओबीसींमध्ये येऊच शकत नाही: प्रकाश शेंडगे
prakash shendge
Follow us on

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीत नवा प्रवर्ग तयार करण्याच्या शक्यतेविषयी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी सुतोवाच केलं होतं. ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मराठा समाज मागासवर्गीय होत नाही, तोपर्यंत ते ओबीसीत येऊच शकत नाही, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. (sambhaji chhatrapati should speak on dhangar reservation, says prakash shendge)

प्रकाश शेंडगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली आहे. जोपर्यंत मराठा समाज मागासवर्गीय होत नाही, तोपर्यंत ते ओबीसीत येऊ शकत नाही. त्यांचं उपवर्गीकरण करणं शक्य नाही, असं शेंडगे म्हणाले.

राजेंचं ‘ते’ वक्तव्य संशयास्पद

महाराजांनी अभ्यास करून विषय मांडले आहेत. पण मराठ्यांना ओबीसीत घ्यावं की घेऊ नये याबाबतचं त्यांचं वक्तव्य संशयास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याचा कधीच निर्णय घेतला आहे. मग तरीही समाजात संभ्रम निर्माण का केला जात आहे? महाराजांनी ही भूमिका बदलली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पदोन्नतीतील आरक्षणावरही बोला

यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांच्यावरही टीका केली. महाराज स्वत:ला बहुजनांचे नेते म्हणवून घेतात. पण मग बहुजनांचं नेतृत्व करताना त्यांना ओबीसींचा विसर कसा पडतो? महाराज केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतात. धनगर आरक्षणावर कधी बोलणार?, असे सवाल करतानाच बहुजनांचे नेते म्हणवून घेत असाल तर महाराजांनी पदोन्नतीतील आरक्षणावर बोलावं, असं आवाहन शेंडगे यांनी केलं.

महाज्योतीलाही दोन हजार कोटी द्या

महाराजांनी सारथी संस्थेला एक हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. पण महाज्योतीसाठी त्यांनी काहीच मागणी केली नाही. महाज्योतीलाही दोन हजार कोटी दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. नाही तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला.

हक्कभंग प्रस्ताव देण्याचा अधिकारच

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. त्यावरही शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली. हक्कभंग प्रस्ताव देण्याचा गोपीचंद पडळकर यांना अधिकारच आहे. हे प्रकरण 2006 सालापासूनचं आहे. ओबीसी समाजालाही पदोन्नतीत आरक्षण हवं आहे. नाही तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला. (sambhaji chhatrapati should speak on dhangar reservation, says prakash shendge)

 

संबंधित बातम्या:

बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू; खासदार संभाजी छत्रपती यांचं मोठं विधान

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं: संजय राऊत

संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल, नारायण राणेंचा शहाजोग सल्ला

(sambhaji chhatrapati should speak on dhangar reservation, says prakash shendge)