समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या मौलानांचा खळबळजनक दावा, दोघे मुस्लिम म्हणूनच निकाह लावला!

मुजम्मिल अहमद यांनीच 2006 साली समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावून दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी हा निकाहनामाही ट्विटवरवर शेअर केला होता. आता हा निकाह लावून देणाऱ्यानेच समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. | Sameer Wankhede

समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या मौलानांचा खळबळजनक दावा, दोघे मुस्लिम म्हणूनच निकाह लावला!
मौलाना मुजम्मिल अहमद
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 1:10 PM

मुंबई: समीर वानखेडे आणि त्यांचे वडील हे मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा शबाना कुरेशी यांचा निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते तर कोणत्याही काझीने निकाह लावूनच दिला नसता, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी सांगितले. मुजम्मिल अहमद यांनीच 2006 साली समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावून दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी हा निकाहनामाही ट्विटवरवर शेअर केला होता. आता हा निकाह लावून देणाऱ्यानेच समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

मुलगा-मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात. त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात बघितलं जातं की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचा बाप मुसलमान आहे की नाही, नंतरच निकाह केला जातो. आधीच माहिती घेतली जात नाही. माहिती तर त्यानं घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे. आम्ही एवढच बघतो की मुलगा-मुलगी मुसलमान आहेत की नाही, आणि ते असतील तर ते राजी असतील तर निकाह केला जातो, असे मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.

समीर वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला.  2017 मध्ये समीर वानखेडे यांनी क्रांती दीनानाथ रेडकर हिच्याशी लग्न केले होते.

‘मुलाचे आई-वडील दोघे मुस्लिम होते’

मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर वानखेडे यांचे आई आणि वडील दोघेही मुस्लीम असल्याचे सांगितले. निदान त्यांनी तरी आम्हाला तसे सांगितले होते. ते मुस्लीम असल्यामुळे आम्ही खातरजमा न करता नेहमीप्रमाणे निकाह लावून दिल्याचे मुजम्मिल अहमद यांनी म्हटले. यावेळी मुलाच्या आई-वडिलांनी स्वाक्षरी केली होती. या सगळ्याची नोंदही आमच्याकडे असेल, असे त्यांनी सांगितले. निकाहदरम्यान गवाह देखील मुस्लिम हवा असतो. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याने निकाह झाला होता. समीर वानखेडे यांनी त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद लिहिलं होतं, अशी माहितीही मौलाना मुजम्मिल अहमद यांनी दिली.

‘त्यावेळी ज्ञानदेव वानखेडे दाऊदच बनले होते’

निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असं मौलाना म्हणाले. त्याचबरोबर ‘टीव्ही 9’ च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितल्याचंही ते म्हणाले. निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितलं होतं. त्यावेळी ते दाऊदच बनले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्यांचं नाव काय असेल ते आम्हाला काय माहिती, असंही मौलाना म्हणाले.

‘निकाहनाम्यावर समीरचं नाव मुस्लिम का?’

नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

हे ही वाचा :

महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंच्या पाठीमागे लागलंय का? पत्नी क्रांती रेडकरचं बेधडक उत्तर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.