वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद, बहिणीचे लग्नही मुस्लिम रिवाजाने, समीर वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्याकडून पोलखोल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी टीव्ही-9 शी खास बातचीत करताना दिली.

वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद, बहिणीचे लग्नही मुस्लिम रिवाजाने, समीर वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्याकडून पोलखोल
dr zahid qureshi
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 12:25 PM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी टीव्ही-9 शी खास बातचीत करताना दिली.

डॉ. जाहीद कुरेशी काय म्हणाले?

“समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते. शबाना कुरेशीसोबतचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार पार पडला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होते, समीरच्या बहिणीचेही लग्न मुस्लिम कुटुंबात झाले आहे”, असं त्यांनी सांगितलं.

“समीर वानखेडेंचे कुटुंब हिंदू आहे हे आम्हाला माहित नव्हते. जेव्हा हे प्रकरण मीडियामध्ये आले तेव्हा आम्हाला कळले की ते हिंदू आहेत. समीर वानखेडेंची आई मुस्लिम होती आणि आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते”, असंही ते म्हणाले.

तसेच, सध्या आम्हाला या प्रकरणात पडण्याची गरज नाही आणि आम्हाला यावर बोलायचेही नाही, असं डॉक्टर कुरेशी यांनी सांगितलं.

नवाब मलिकांनी ट्विट केलेला निकाहनामा खरा, मौलानांनी खरं खरं सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याचंही सांगितलं.

मौलाना मुज्जमिल अहमद नेमकं काय म्हणाले?

समीर आणि शबाना हे दोन्ही मुस्लीम असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं काझीनं निकाह लावला. जर दोन्हीपैकी एकजण मुस्लीम नसते तर त्यांचा निकाह झाला नसता. समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखे़डे हे मुस्लीम होते त्यामुळे त्यांचा निकाह झाला. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे. समीरच्या लग्नावेळी सर्वजण मुस्लीम असल्याचं सांगण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नावेळचा फोटो दाखवला असता तो देखील खरा असल्याचं मौलाना म्हणाले.

संबंधित बातम्या :

KP Gosavi | अखेर के पी गोसावी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सकाळीच अटकेची कारवाई

आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंची एन्ट्री, धक्कादायक गौप्यस्फोट करत पाच लाखांच्या ऑफरचा दावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.