समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. (Sameer Wankhede Followed Islam, His Father's Name Is Dawood: nawab malik)
ठाणे: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुस्लिम आहे. त्यांचे नातेवाईकही मुस्लिमच आहे, असं सांगतानाच बोगस दाखल्यावरूनच वानखेडे यांनी नोकरी मिळवली असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला. समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.
नावं बदलली, घटस्फोटही घेतला
वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली. फेसबूकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असं त्यांनी सांगितलं.
दाल में कुछ काला है
अरुण हलदर हे भाजपचे नेते आहेत. आता ते मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. संवैधानिक पदावर नेमणूक झाल्यावर काही पथ्य पाळायचे असतात. तक्रार मिळाल्यावर त्यांनी आधी त्या तक्रारीची चौकशी केली पाहिजे. तथ्य आणि सत्य शोधून काढलं पाहिजे. नंतर अहवाल करून संसदेत ठेवला पाहिजे. थेट कोणी आला आणि कोणी सांगितलं. तर थेट मीडियासमोर बोलणं म्हणजे दाल में कुछ काला है. जबाबदार पदावरील व्यक्ती असं विधान करतो. संवैधानिक पदाची काही कार्यपद्धती असते. कागदपत्रं मिळाल्यानंतर चौकशी केली पाहिजे. जो व्यक्ती मागासवर्गीय नाही आणि मागासवर्गीयांचे अधिकार हिरावून घेतो, त्याची हलदर बाजू घेत आहेत. हे योग्य नाही, असं ते म्हणाले.
नीरज गुंडे मागच्या सरकारचा दलाल
नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. सर्व शासकीय कार्यालयात याचा मुक्त वावर आहे. समीर वानखेडे सोबत ही नीरज गुंडेचे संबंध आहेत. एक माजी मुख्यमंत्री सुद्धा नीरज गुंडेच्या चेंबूरच्या घरी जाऊन बसत होते. ईडीच्या कार्यालयात ही नीरज गुंडेचा मुक्त वावर होता, असा दावा मलिक यांनी केला.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 October 2021 https://t.co/nNenqMxenk #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021
संबंधित बातम्या:
1 नोव्हेंबरपासून बँकेच्या ‘या’ नियमांत होणार बदल, जाणून घ्या सर्वकाही
रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही
पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; मजूर ढिगाऱ्याखाली दबले, 12 जण जखमी
(Sameer Wankhede Followed Islam, His Father’s Name Is Dawood: nawab malik)