काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटसअॅप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?
क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीचं देशभरातून कौतुक होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कारवाईबाबतचा गौप्यस्फोट केला. (Sameer Wankhede quit the whatsapp group of selective journalism)
मुंबई: क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीचं देशभरातून कौतुक होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कारवाईबाबतचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. त्यानंतर आज वानखेडे यांनी पत्रकारांचा व्हॉट्सअॅपग्रुपच सोडला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मलिकांचे आरोप काय?
नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन थेट एनसीबीच्या कारवाईवरच सवाल उपस्थित केला होता. एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवाल मलिक यांनी केला होता. एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढणायत आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही. तो भाजपचा कार्यकर्ता मनिष भानुशाली आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवालही त्यांनी केला होता.
वानखेडेंनी उत्तरे टाळली
त्यानंतर समीर वानखेडे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. क्रूझ आणि अंधेरी येथे करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. 2 तारखेला आम्ही कारवाई केली, त्यावेळी वेगवेगळे ड्रग्स सापडले, त्यावेळी आठ लोकांना अटक केली. मोहक जैस्वालच्या माहितीनंतर अब्दुल कादीर शेखला अटक केली, एमडी ड्रग्ज सापडलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला गोरेगाव मुंबईला ही कारवाई केली, श्रेयस नायरला अटक केली. मनीषकडे हायड्रोफोनिक वीड सापडलं. प्रभाकर साईल, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर हे वैयक्तिक साक्षीदार आहेत. जे आरोप आमच्यावर होत आहेत ते चुकीचे आहेत, याचा थेट संबंध यापूर्वी केलेल्या कारवाईशी आहे. कोकेन, चरस आदी ड्रग्स सापडलेत, असंही एनसीबीनं स्पष्ट केलंय. मात्र, त्यानंतरही पत्रकारांनी मलिकांच्या आरोपांवर वानखेडे यांना बोलतं केलं. पण वानखेडे यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.
आज व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला
समीर वानखेडे हे काही मोजक्या पत्रकारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आहेत. पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी मलिक यांच्या या आरोपावरून वानखेडे यांना व्हॉट्सअॅपवरून रिअॅक्शन विचारण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्याने वानखेडे यांनी अखेर या ग्रुपमध्येच बाहेर पडणं पसंत केलं. मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या टीमवर केलेल्या आरोपानंतर वानखेडे हे चिडचिडे झाल्यानेच त्यांनी ग्रुप सोडल्याचं सांगितलं जात आहे. मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने व्यवस्थित उत्तर न दिल्यानेच वानखेडे हे घेऱ्यात आले असल्याचंही सांगितलं जात आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनीही वानखेडे यांनी पत्रकारांचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याचं ट्विट केलं आहे.
After NCP minister @nawabmalikncp big revelation of involvement of private people & BJP workes in NCB’s Cruise raid, @narcoticsbureau Zonal Director #SameerWakhende quit the what’s app group of selective journalists. He seems to be rattled with allegations charged against him.
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) October 7, 2021
संबंधित बातम्या:
अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत, आयकरच्या धाडीवर राष्ट्रवादी प्रदेशांची पहिली प्रतिक्रिया
माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का, अजित पवारांचा संताप
(Sameer Wankhede quit the whatsapp group of selective journalism)