साडेपाच लाखांच्या घोटाळ्याची ईडी चौकशी…, ED वर संदिप राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 30, 2024 | 1:04 PM

Khichdi Scam sandeep raut on ed | कोविड काळामध्ये त्यांच्याकडे किचन नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्या हॉटेलचे किचन वापरले. त्यांच्याकडे साहित्य नव्हते. मी ते त्यांना दिले. कोविड काळामध्ये कोणीही काम करण्याची हिम्मत दाखवत नव्हते. परंतु आता चौकशीला समोरे जाण्यास आम्ही तयार आहोत.

साडेपाच लाखांच्या घोटाळ्याची ईडी चौकशी..., ED वर संदिप राऊत यांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई, दि.30 जानेवारी 2024 | शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांच्यामागे ईडी चौकशी लागली आहे. या चौकशीवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. दुसरीकडे संजय राऊत यांनी ईडी चौकशीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. संदीप राऊत म्हणाले की, आजच कळले की पाच साडेपाच लाखांच्या घोटाळ्यासाठी पण ईडी चौकशी होई शकते. हे काय ईडीचे काम आहे ? या पद्धतीने खालच्या स्तराला जाऊन चौकशी करून काय सिद्ध करायचे आहे. मुळात घोटाळा काय हेच मला माहित नाहीये, असे संदीप राऊत यांनी म्हटले आहे.

विरोधकांना त्रास देण्याचा प्रकार

सत्ताधारी विरोधकांना त्रास देण्याचे काम करत आहे. राजकारणातील विरोधक आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देऊन वेठीस धरण्याचे उद्योग सध्या सुरु आहे. तुम्ही रामाचं नाव घेता आणि असे घाणेरडे राजकारण करतात. तुमच्या विरोधात बोलले की त्यांच्या मागे ईडी इन्कम टॅक्सची चौकशी सुरु होते. सीबीआयला बोलवले जाते, असे संदीप राऊत यांनी म्हटले.

काय आहे हा प्रकार

राजीव साळुंखे माझे चांगले परिचित आहेत. कोविड काळामध्ये त्यांच्याकडे किचन नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्या हॉटेलचे किचन वापरले. त्यांच्याकडे साहित्य नव्हते. मी ते त्यांना दिले. कोविड काळामध्ये कोणीही काम करण्याची हिम्मत दाखवत नव्हते. परंतु आम्ही जनतेची सेवा केली आहे. त्या सेवेचा आम्हाला असा मोबदला मिळत आहे. पण आमची चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. आम्ही घाबरणारे नाही.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी सांगितले खिचडी घोटाळ्यातील आरोपी

भावाच्या ईडी चौकशीनंतर खासदार संजय राऊत आक्रमक झाले. आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ. खिचडी घोटाळा म्हणता, परंतु ज्यांनी ही काम केली त्याचे कंत्राट आता देवगीरी आणि वर्षा बंगल्यावर आहे. राहुल कनाल, अमेय घोले आणि इतर नाव ही आहेत. हे शिंदे गटाचे आहेत. तुम्ही सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली त्यांच्या प्रार्टनरवर का कारवाई करत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.