Ajit Pawar : ‘सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केल्याने अजितदादा नाराज, लवकरच पोटातलं ओठावर येईल’, पाहा कोणी केलाय दावा!

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तेव्हापासूनच अजित दादा नाराज असल्याचं बोलत आहेत.

Ajit Pawar : 'सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केल्याने अजितदादा नाराज, लवकरच पोटातलं ओठावर येईल', पाहा कोणी केलाय दावा!
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 7:41 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये केलेल्या भाषनानंतर राजकीय वर्तुळात अजित दादा नाराज असल्याचा चर्चा होत आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तेव्हापासूनच अजित दादा नाराज असल्याचं बोलत आहेत.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यामधील कार्यक्रमामध्ये, मला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा, हे वक्तव्य खूप काही सांगतं. अशातच शिंदे गटातील मंत्री असलेल्या आमदाराने यावर उघडपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोण आहेत ते आमदार आणि काय म्हणाले?

अजित पवार हे बऱ्याच दिवसापासून नाराज दिसतात. सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष केल्याने ते नाराज असतील. त्यांचा पक्षातील अंतर्गत विषय असून पण पोटातील ओठावर एक दिवस येणारच. अजित पवार असे आहेत की त्यांच्या पोटात काही राहत नाही.  कधीना कधी ते बाहेर येणारच असल्याचं संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे.

सरकार पडण्याची स्वप्न फक्त संजय राऊत यांना पडतात. आपली राहिलेली लोकं टिकली पाहिजेत, यासाठी संजय राऊत अशा प्रकारे बोलत आहेत. सरकार एक महिन्यात जाईल, दोन महिन्यात जाईल ते असं म्हणता म्हणता  हे सरकार 2024  पर्यंत काम करणार आहे. त्यानंतरही परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार येणार असल्याचं संदिपान भुमरे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये काय म्हणाले होते अजित  पवार?

मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केल्याचं अजित  पवार म्हणाले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.