संजय राठोड अखेर बोलणार?; ‘या’ ठिकाणी येऊन साधणार संवाद?

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. (sanjay rathod will talk about Pooja Chavan Suicide Case in two days)

संजय राठोड अखेर बोलणार?; 'या' ठिकाणी येऊन साधणार संवाद?
संजय राठोड, वनमंत्री
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 6:29 PM

मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राठोड यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. राठोड यांच्या भोवतीची संशयाची सूई अधिकच वाढत चालल्याने अखेर राठोड हे गुरुवारी या प्रकरणावर बोलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sanjay rathod will talk about Pooja Chavan Suicide Case in two days)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे राठोड नेमके गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. मात्र, आता राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिममधील पोहरा देवी येथे येऊन राठोड त्यांची बाजू मांडणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राठोड नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

धर्मगुरुंच्या साक्षीने बाजू मांडणार?

वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

समाज राठोडांच्या पाठी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव गोवलं जात आहे. यामुळे बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरु आहे. ही बदनामी थांबवावी अशी भूमिका बंजारा धर्मगुरू आणि महंतांनी मांडली. पोहरादेवी इथं सेवालाल जयंती उत्सव सुरु आहे. या उत्सवादरम्यान समाजाच्या संत महंतांनी राठोड यांना पाठिंबा दिला आहे.

हा आमचा सामाजिक विषय

पूजा चव्हाण ही आमच्या समाजाची एक होतकरु तरुणी होती. तिची आत्महत्या दुर्दैवी आहे. मात्र, या आत्महत्येच्या आडून आमच्या समाजाच्या नेत्याची राजकीय कारकिर्द संपवण्याचं कटकारस्थान विरोधकांकडून केलं जात असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या महंतांकडून करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या निमित्ताने मीडिया ट्रायल केली जात आहे, यामुळं बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरु आहे. आम्ही पूजाच्या कुटुंबाच्या दु:खातही सहभागी आहोत आणि संजय राठोडांच्या पाठिशीही ठामपणे उभे आहोत असं या महंतांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढं आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत. (sanjay rathod will talk about Pooja Chavan Suicide Case in two days)

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा नोंद नाही: पुणे पोलीस

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(sanjay rathod will talk about Pooja Chavan Suicide Case in two days)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.