AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : बुंद से गयी, वो हौदसे नही आती, धसांना राऊतांचा सूचक टोला, म्हणाले त्यांचा बुरखा…

Sanjay Raut Criticized Suresh Dhas : मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यावर चोहो बाजूनी एकच हल्लाबोल झाला. यापूर्वी त्यांनी डील केल्याचा संशय व्यक्त करणारे संजय राऊत यांनी पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे.

Sanjay Raut : बुंद से गयी, वो हौदसे नही आती, धसांना राऊतांचा सूचक टोला, म्हणाले त्यांचा बुरखा...
संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Follow us
| Updated on: Feb 21, 2025 | 10:44 AM

मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस चांगलेच ट्रोल झाले. एकदा रुग्णालयात ते मुंडे यांना भेटले. तर दुसऱ्यांदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच लांबलचक बैठक झाली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नाही. पण धस चांगलेच अडचणीत आले. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरण, घोटाळ्यात आरोपांची राळ उडवल्यानंतर मुंडे भेटीने ते ट्रोल झाले. यापूर्वी त्यांनी डील केल्याचा संशय व्यक्त करणारे संजय राऊत यांनी पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे.

अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर

संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत अजित पवार यांच्या पक्षावर आणि मंत्र्यांवर गरजले. दोन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. माणिक कोकाटे यांच्या नाव न घेता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका मंत्र्याला कोर्टाने शिक्षा ठोठावली, असे ते म्हणाले. त्यामुळे येते अधिवेशन वादळी असेल. सभागृह चालेल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष निष्पक्ष नसल्याचा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला. 40 आमदारांच्या प्रकरणात, त्यांचे चारित्र्य समोर आल्याचे राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अंजली दमानिया, सुरेश धस हे कृषी खात्यापासून इतर भ्रष्टाचाराची प्रकरणं, घोटाळे बाहेर काढत आहेत. पण नैतिकतेच्या मुद्दावर ही ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. अजित पवार यांनी नाही तर मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे, असे त्यांनी ठणकावले.

त्यांचा बुरखा फाटला

सुरेश धस यांच्या आरोपांवर राऊतांना चांगलेच तोंडसुख घेतले. आता धस यांच्यावर कोणी विश्वास ठेवेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. तरीही ते मैदानात असल्याचे भासवत आहेत. ते मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. ठीक आहे. ते चांगले नाटक वठवत असल्याचा चिमटा राऊतांनी त्यांना काढला. धस यांचा बुरखा फाटल्याचा टोला त्यांनी लगावला. बुंद से गयी, वो हौदसे नही आती, असा मार्मिक टोला त्यांनी धसाला लगावला.

त्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यांना अंधारात ठेवून भेटीचे नाट्य घडले असेल. पण ज्या क्षणी मुंडे त्या ठिकाणी आले, त्याचवेळी त्यांनी बैठकीतून बाहेर पडणे अपेक्षित होते. बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला हवं होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मी खंबीरपणे अजूनही लढतोय, असे त्यांनी सांगायला हवे होते, असे राऊत म्हणाले.

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.