Sanjay Raut: लक्षात ठेवा, त्याच कबरीमध्ये तुम्हालाही जावे लागेल; संजय राऊतांचा एमआयएमला इशारा

Sanjay Raut: काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांची सुरक्षा, त्यांच्या सोयीसुविधा हा मोदी शहांचा मुख्य अजेंडा होता. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता.

Sanjay Raut: लक्षात ठेवा, त्याच कबरीमध्ये तुम्हालाही जावे लागेल; संजय राऊतांचा एमआयएमला इशारा
लक्षात ठेवा, त्याच कबरीमध्ये तुम्हालाही जावे लागेल; संजय राऊतांचा एमआयएमला इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 12:54 PM

मुंबई: एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदू महासंघाने (hindu maha sangh) तर औरंगजेबाची कबर हवीच कशाला? असा सवाल करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनीही ओवैसींवर टीका केली आहे. हे रितीरिवाज नाहीत. वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे. पण मी आज इतकेच सांगेन की ज्या औरंगजेबाच्या कबरी पुढे तुम्ही आज नमाज पढत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे. कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीमध्ये जावे लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. काश्मिरी पंडितांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिक इमोशनल आहेत. त्यांनी सहा सात वर्षांत काय केलं माहीत नाही. पण अजूनही काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे. काल एका सरकारी कर्मचाऱी असलेल्या काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे. ज्याप्रकारे ही हत्या झाली, ते चिंताजनक आहे. याची शहांनी याची गंभीर दखल घ्यावी. नेहमी पाकिस्तानकडे बोट दाखवण्याची गरज नाही. आपण काश्मिरी पंडितांसाठी काय करणार आहोत? 370 नंतरही काश्मिरी पंडित आणि सामान्य जनता सुरक्षित नाहीये. काश्मिरात अस्थिर आणि अशांतेचा माहोल आहे, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काश्मीर पंडितांची समस्या सुटली नाही

काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांची सुरक्षा, त्यांच्या सोयीसुविधा हा मोदी शहांचा मुख्य अजेंडा होता. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता. तरिही काश्मिरी पंडितांची समस्या अजूनही संपलेली नाही. काश्मिरी पंडितच नव्हे तिथला सामान्य माणूसही सुरक्षित नाही, असं वातावरण तयार केलं जातंय. शिवसेना काश्मीर पंडितांच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहतेय. सरकार काय करतंय..? एका बाजुला चीन घुसलाय, दुसरीकडे काश्मिरात अशांतता आहे, असंही ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.