VIDEO: रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, बाप काय असतो हे दाखवूच; राऊतांनी भाजपला ललकारले

| Updated on: Feb 19, 2022 | 3:23 PM

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  यांनी ईडीच्या चौकश्यांवरून भाजपवर (bjp) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे.

VIDEO: रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, बाप काय असतो हे दाखवूच; राऊतांनी भाजपला ललकारले
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, बाप काय असतो हे दाखवूच; राऊतांनी भाजपला ललकारले
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  यांनी ईडीच्या चौकश्यांवरून भाजपवर (bjp) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असा इशारा शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी दिला. आम्ही कुणाला टार्गेट करत नाही. लोकं आमच्या हातात पुरावे आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवलं आहे. ती तुमची साधनं झाली आहेत. हे क्रिमिनल सिंडिकेट आहे. ते उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणाला अंगावर यायचं असेल तर या. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तुम्हाला तोंड काळं करून जावं लागेल. आता बंद करा हे धंदे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही हल्लाबोल केला. सोमय्यांचं गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण देतो. पालघरला येऊर नावाच्या गावात सोमय्यांचा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्याचा मुलगा नील सोमय्या यांच्या नावाने हा प्रकल्प सुरू आहे. त्यांची पत्नी मेधा किरीट सोमय्या या प्रकल्पाच्या डायरेक्टर आहेत. या 260 कोटींच्या प्रकल्पात ईडीच्या डायरेक्टरचे किती पैसे आहेत? ही बेनामी प्रॉपर्टी एका ईडीच्या संचालकाची आहे. हे मी जाहीरपणे विचारलं आहे. हे कोटी कोटी रुपये यांच्याकडे येतात कुठून?, असा सवाल राऊत यांनी केला.

उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही

सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज प्रकरणे काढणार आहोत. तुम्हाला त्याची उत्तरं द्यावं लागलतील. आणि ईडीच्या कार्यालयात आम्ही लाखो लोकं लवकर जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजाराची चौकशी करताना आम्ही तुम्हाला हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून कसे लुटले गेले?कसा भ्रष्टाचार केला? याची माहिती देतो. करा चौकशी. आता आम्ही तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार; राणेंच्या अडचणी वाढणार?

लाव रे तो व्हिडिओः फडणवीस-सोमय्यांचा व्हिडिओ लावून विनायक राऊतांकडून राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

शिवराय साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून महाराजांना अनोखी मानवंदना, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…