Ravi Rana on Sanjay Raut | बकबक करणारे संजय राऊत चवन्नीछाप; त्यांच्याविरोधात राज्यात गुन्हा का नाही? रवी राणांनी डिवचलं
खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार केली. पण, महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही. शिवसैनिकांनी आमच्या घरावर हमला केला. तरीही त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल होत नाही. आम्ही हनुमानाचं नाव घेतो. त्यासाठी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे.
मुंबई : आमदार रवी राणी रुग्णालयाबाहेर आल्यानंतर तब्बल चौदा दिवसांनी माध्यमांशी प्रत्येक्ष बोलले. राणा म्हणाले, मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. त्यांच्या आदेशाचे पालन करणार आहे. त्यांच्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. कोर्टाच्या नियमांवर आमचा विश्वास आहे. कोर्टानी राजद्रोहाचा गुन्हा हा चुकीचा आहे, हे सांगितलं. त्या कोर्टावर (Court) आक्षेप घेण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मला वाटतं संजय राऊत हे चवन्नीछाप आहेत. चवन्नीछाप संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बकबक करतात. कोर्टावरही ते ताशेरे उमटवितात. त्यांना हा अधिकार कुणी दिला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना वीस फूट खड्ड्यामध्ये गाळू. स्मशानात गवऱ्या पाठविल्या. अशाप्रकारचं वक्तव्य करणारे संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य (Member of Rajya Sabha) आहेत. चवन्नीछापसारख्या गोष्टी करतात. राणा म्हणाले, मला वाटते, संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली.
हनुमानाचं नाव घेणं राजद्रोह कसा?
खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार केली. पण, महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही. शिवसैनिकांनी आमच्या घरावर हमला केला. तरीही त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल होत नाही. आम्ही हनुमानाचं नाव घेतो. त्यासाठी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. मी लोकांसाठी लढतो. पण, मला अशी क्रूर वागणूक दिली जाते. मुख्यमंत्र्यांमध्ये अहंकार आहे. रावणाचा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला आहे. आम्ही चौदा दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार चूरचूर झाल्याशिवाय राहणार नाही, असंही रवी राणा म्हणाले. हनुमंताचं नाव घेणाऱ्यांवर राजद्रोहाचा गु्न्हा दाखल होतो. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ही मागणी आम्ही दिल्ली दरबारी करणार आहोत.
संजय राऊतांविरोधात गुन्हा का नाही?
अमरावतीला आमच्या घरावर हल्ला झाला. शिवसैनिकांनी दगड फेकले. पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली. हे संपूर्ण देश पाहत होता. माझ्या घरी चार, सात वर्षींची मुलं होती. तिथं जाऊन शिवसैनिक दगड मारत होते. त्यांना आदेश दिला जातो की, त्यांच्या घरावर हमला करा. दिल्लीमध्ये संजय राऊत व अनिल परब यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली आहे. त्यावर केंद्रानं समोर येऊन कारवाई केली पाहिजे. येणाऱ्या काळात रामभक्त आणि हनुमान भक्त येणाऱ्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जागा दाखवतील. संजय राऊत व अनिल परब यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स ईडीकडं प्रलंबित प्रकरणांचा दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचं राणा यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे सरकार बाईला घाबरली
राणा म्हणाले, घरून नेताना पोलीस ठाण्यात चला आम्ही तुम्हाला बेल देऊ, असं सांगण्यात आलं होतं. घरावर दगड फेकणाऱ्या, बॉटल्स फेकणाऱ्या शिवसैनिकांवर कुठलीही कारवाई केली नाही. पोलीस ठाण्यात चहा पाजला. पण, शांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये नेल्यावर आम्हाला वॉशरूम यूज करू दिला नाही. पंखा, नाही चटई नाही. रात्री बारापासून सकाळी पाच वाजतापर्यंत आम्ही चटई, पंखा व पाण्यासाठी मागणी करत होतो. पण, काही मिळालं नाही. उद्धव ठाकरे सरकार नवनीत राणा बाईला घाबरलेली आहे. त्यामुळं त्यांनी आमच्यावर सक्तीची कारवाई केली, असा आरोप त्यांनी लावला.