लुटीच्या पैशांतून असे प्रकार…नोटा उधळण्याचा व्हिडिओनंतर संजय राऊत यांचा थेट हल्ला
बाळासाहेबांकडे कायम दिघे साहेबांचा तिरस्कार करणे, त्यांच्याविषयी चुकीचे सांगणे असे प्रकार संजय राऊत करत होते. या सर्व मंडळींनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणातून संपवण्याची सुपारी घेतली होती. त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते, असे खासदार म्हस्के यांनी म्हटले.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडिओसमोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले आहे. त्यांनी या प्रकरणात शिंदे गटावर जोरदार हल्ला केला आहे. लुटीच्या पैशांतून असे प्रकार होत आहे, आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचा पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाण्यातील आनंद आश्रमातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारा आहे. तो व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत. एक धिंगाणा त्या वास्तूमध्ये आम्ही पाहिला आहे. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? लुटीच्या पैशांतून असे प्रकार केले जात आहेत का? असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहे. त्या ठिकाणी एक हंटर लावण्यात आले आहे. आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचा पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते. आनंद दिघे असे वागणाऱ्यांचा समर्थन करत नव्हते. तसेच जे आनंद दिघे यांना गुरू मानतात ते सुद्धा प्रकार करु शकत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांना खासदार नरेश म्हस्केंचे उत्तर
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. युतीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ते अपमान करत आहेत. दिघे साहेब द्वेष्टा माणूस आहे. दिघे साहेबांनी नेहमी संजय राऊत या माणसाचा तिरस्कार केलेला आहे. या माणसाने कायम दिघे साहेबांना विरोध केलेला आहे. खोपकर हत्याकांडानंतर त्यांनी लोकप्रभेमध्ये जो लेख लिहिला त्यात काही गोष्टी लिहिल्या. त्यामुळे दिघे साहेबांना टाडा लागला होता. दिघे साहेबांना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागलेल्या आहेत. त्याला केवळ संजय राऊत जबाबदार आहेत.
बाळासाहेबांना चुकीची माहिती संजय राऊत देत होते
बाळासाहेबांकडे कायम दिघे साहेबांचा तिरस्कार करणे, त्यांच्याविषयी चुकीचे सांगणे असे प्रकार संजय राऊत करत होते. या सर्व मंडळींनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणातून संपवण्याची सुपारी घेतली होती. त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते, असे खासदार म्हस्के यांनी म्हटले. संजय राऊत यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये. दिघे साहेब गेल्यानंतर त्यांना कधी त्यांची आठवण झाली नाही, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिघे साहेबांचे नाव देण्याचा ठराव या लोकांनी आम्हाला बासनात बांधायला लावला, नाट्यगृहाला दिघे साहेबांचं नाव देऊ दिले नाही, एवढा तिरस्कार ही मंडळी करत होती. आनंद आश्रमातील प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई केली आहे, असे त्यांनी म्हटले.