Sanjay Raut : येड XX आहे तो, अशा XXX स्थान नाही, राऊतांची पुन्हा सोमय्यांना ‘ऑन रेकॉर्ड’ शिवराळ भाषा
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक आरोप केला. या आरोपानंतर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर माइकसमोर शिवीगाळ केली. हा येड XX आहे... असे शब्द वापरत, मी हे ऑनरेकॉर्ड बोलतोय अशा शब्दात राऊत यांनी ठणकावून सांगितले.

नवी दिल्ली | निवडणुकीच्या आखाड्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमधील वाद विकोपाला गेला असून किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकींनीही कळस गाठला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक आरोप केला. या आरोपानंतर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर माइकसमोर शिवीगाळ केली. हा येड XX आहे… असे शब्द वापरत, मी हे ऑनरेकॉर्ड बोलतोय अशा शब्दात राऊत यांनी ठणकावून सांगितले. संरक्षण खात्याच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या जहाजासाठी किरीट सोमय्या यांनी जवळपास 57 कोटी रुपये गोळा केले, मात्र ते स्वतःच्या घशात घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. लाखो मुंबईकरांच्या राष्ट्र भावनेशी सोमय्या यांनी खेळ केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यापूर्वीदेखील भर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा पोत खालच्या पातळीवर घसरल्याची टीका सर्व स्तरांतून केली गेली होती.
काय म्हणाले संजय राऊत?
हा येड XX आहे. ही कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. ही कीड संजय राऊत संपवणार. ही कीड शिवसेना संपवणार. पराक्रम काय सांगतो मला? हे सगळे महाराष्ट्रद्रोही… आता देशद्रोही. आयएनएस विक्रांतच्या नावावर तुम्ही जनतेकडून पैसे गोळा करता? कोट्यावधी रुपये…. आम्ही तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणताय? हा देशद्रोह आहे, देशभावनेशी खेळण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला आहे, वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
INS विक्रांताच घोटाळा काय?
संजय राऊत यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आणखी एक घोटाळा उघड केला. 2013-14 मध्ये आयएनएस विक्रांत हे जहाज भंगारात जाण्यापासून रोखण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत त्या वेळी जवळपास 57 कोटी रुपये जमा झाले होते. या निधीतून जहाजावर संग्रहालय उभारण्याची योजना होती. हा निधी राज्य शासनाकडे सुपूर्द करणार असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले होते. मात्र माहितीच्या अधिकाराखाली चौकशी केली असता, असा कोणताही निधी राज्य शासनाला मिळाला नसल्याचे पत्र राज्यपालांनी पाठवले असल्याचं संजय राऊत यांनी उघड केलं. त्यामुळे तत्कालीन मुंबईकरांनी राष्ट्रभावनेपोटी दिलेली लाखो रुपयांची देणगी किरीट सोमय्या यांनी घशात घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
INS प्रकरणी सोमय्या काय म्हणाले?
दरम्यान, आयएनएस विक्रांत प्रकरणी संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत, त्यावर उद्धव ठाकरे सरकारने विशेष चौकशी समिती नेमावी. पत्रकार परिषदेत कागदं दाखवून काही उपयोग नाही. सरकारनं चौकशी समिती नेमल्यास आम्ही त्यास सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
इतर बातम्या-