मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी अत्यंत जहरी भाषेत सोमय्यांवर टीका करताना त्यांनी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप केला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज (mohit kambhoj) यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच मोहीत कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन डुबणार असल्याचा दावाही केला. राऊत सुमारे पाऊणतास बोलले. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले. पण या पाऊणतासात त्यांनी साडे तीन नेत्यांची नावे काही घेतली नाही. उलट पत्रकार परिषद झाल्यावर पत्रकारांनीच साडेतीन नेत्यांबाबत विचारताच यथावकाश या नेत्यांची नावे जाहीर करू. आज तर केवळ ट्रेलर आहे, असं सांगून संजय राऊतांनी साडेतीन नेत्यांची नावे घेण्यास नकार दिला. त्यामुळे ते साडेतीन नेते कोण? याचं गूढ कायम राहिलं आहे.
संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला डझनभर शिवसेना नेते हजर होते. यावेळी त्यांनी थेट किरीट सोमय्यांवरच हल्ला सुरू केला. सोमय्यांची प्रकरणं पत्रकारांसमोर मांडली. पत्रकार परिषद संपल्यावर ते साडेतीन नेते कोण? असा सवाल करण्यात आला. त्यावर, कोई आदा है.. कोई पाव है.. कोई चाराणेवाला है.. हळूहळू सगळं कळेल, असं म्हणत राऊत यांनी या साडेतीन नेत्यांची नावे सांगणं टाळलं.
गोष्ट इथे संपलेली नाही. हा ट्रेलर आहे. आता व्हिडीओ क्लिप आणि सगळे पुरावे घेऊन येणार. सिनेमा अजून बाकी आहे. दिल्लीत काही जण गेलेत, त्यांनी जिथं जायचंय तिथे जावं. आता माघार नाही, असंही ते म्हणाले.
आधीच म्हटलं, हे सेना भवन आहे. साहेबांची प्रेरणा आहे आमच्या मागे. आधीही म्हटलं होतं. आता पुन्हा सांगतो. डरेंगे नहीं, झुकेंगे नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार. तेव्हा हे घाबरवणारे कुठे असतील, ते बघून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
मोहीत कंबोज.. फडणवीसांचा हा फ्रंटमॅन आहे. तो ब्लू आईड बॉय आहे. पण मी सांगतो तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्राचाळीचा मुद्दा आहे, ती जमीन खरेदी करणाराच कंबोज आहे. पीएमसीचे पैसे तिथंच गुंतलेत. तिथं मोहितचाच प्रोजेक्ट सुरु आहे, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा, राऊतांची मागणी, नेमके आरोप काय?
मैं पुछना चाहता हुँ, फडणवीसांचं थेट नाव घेत राऊतांचा 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, घेरलं?
Sanjay Raut: तो मुलूंडचा दलाल, भXवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली