Video | मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली; संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, बाकी कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलेन्स्की, पुतिन. सारे बिनकामाचे आहेत. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है. असे चमचे आम्ही पाहिले नाहीत.

Video | मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली; संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका
Sanjay RautImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 11:56 AM

मुंबईः मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली आहे. मालिक तो महान है. बस चमचों से परेशान है, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिवसांतून 22 तास जागे असतात, असा उल्लेख केला होता. पाटील म्हणाले होते की, आपल्याला आगामी काळात एकन एक निवडणूक जिंकावी लागणार आहे. 2024 ला आपल्याला 400 पेक्षा जास्त जिंकायच्या आहेत. काही गोष्टी करण्यासाठी तीन चर्तुर्थांश बहुमत आवश्यक आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण कमी पडलो असतो तर राष्ट्रपती निवडणूक आपण गमावली असती. एक मोदी तयार होण्यासाठी अनेकजण मेहनत करत असतात. मोदी यांनी त्यांच्यावर होणारी मेहनत वाया जाऊ दिली नाही. ते 22 तास काम करतात. नरेंद्र मोदी एक प्रयोग करतात. त्यामध्ये त्यांना झोपावे लागणार नाही. नरेंद्र मोदी सकाळी 6 वाजता फोन करतात. त्यामुळे मंत्री पहाटे 5.30 वाजल्यापासून सतर्क असतात. आता त्यांना रात्रभर सतर्क राहावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

राऊतांनी काय दिले उत्तर?

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा संजय राऊतांनी जोरदार समाचार घेतला. राऊत म्हणाले, मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 पैकी 22 तास काम करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. आता म्हणे मोदी यांना ती 2 तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झोप उडेल. बाकी कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलेन्स्की, पुतिन. सारे बिनकामाचे आहेत. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है, असा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना लगावला. असे चमचे आम्ही पाहिले नाहीत, असा चिमटाही त्यांनी घेतला.

मेहबुबांना शक्ती दिली

संजय राऊत म्हणाले की, अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयत. या मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले आहे. शिवसेनेने नेहमी या विचारधारेचा विरोध केला, अशी टोलेबाजी राऊत यांनी केली.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.