मुंबई : “काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नये, एखादा दगड तुमच्या घरावर बसला तर तुमचाही महाल कोसळून पडेल. विरोधी पक्षाने भान ठेवलं पाहिजे. त्यांनीसुद्धा संयम ठेवला पाहिजे. आपण सुद्धा कधीकाळी सत्तेवर होता. आपण सुद्धा राजकारणामध्ये आहात. हमाम में सब नंगे है, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आम्ही नितीमत्ता सांभाळतो, आम्ही संयम पाळतो, नितीमत्ता आम्हाला कुणी शिकवू नये. पण नितीमत्ता तुम्ही किती पाळता याचा हिशोब करायला कुणी खातं-वही घेऊन बसलं, तर त्रास होईल”, अशा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला दिला (Sanjay Raut on Dhananjay Munde case).
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (15 जानेवारी) आपली भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली (Sanjay Raut on Dhananjay Munde case).
“याप्रकरणी घाईघाईने कोणताही निर्णय या संदर्भात घेतला जाऊ नये. अर्थात ते सर्व अधिकार शरद पवार यांचे असते. पण काही लोकांनी परस्पर ठरवलं आहे की, तेच कायदा आहेत आणि तेच कोर्ट आहेत. तेच कुणावरही आरोप करायचे, कुणाला शिक्षा ठोठावायची, कुणाला पदावरुन खाली उतरवायचं, हे ते परस्पर ठरवतात. अशा प्रवृत्तींना उत्तेजन मिळू नये, म्हणून अशा प्रकरणांची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“कालपासून धनंजय मुंडे प्रकरणाला जी कलाटणी मिळाली आहे, तक्रारदार व्यक्तीबाबतही अनेक तक्रारदार आहे. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीबाबतचे प्रकरणही गंभीर आणि धक्कादायक वाटायला लागलं आहे. ही एकच प्रवृत्ती नाही तर अशा अनेक प्रवृत्त्या आहेत ज्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत”, असं राऊत म्हणाले.
“हनिट्रॅप महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता. पण अलिकडे ज्याप्रकारचं राजकारण गेल्या वर्षभरात चाललं आहे, चिकलफेक आणि बदनाम करण्याचं, त्यामध्ये वाढ झाली आहे. यात फक्त व्यक्तीची बदनामी नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची बदनामी होतेय, असं मला वाटतंय. म्हणून या सर्व विषया प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये, या मताचा मी सुद्धा आहे. सकाळीच शरद पवारांना आम्ही भेटलो. सर्वांचीच ती भावना आहे. त्या भावनेचा आदर पवारांनी केला आहे”, असं त्यांनी सांगितलं.
ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर
“पोलीस आणि कायदा त्यांचं काम करत असतात. सरकार किंवा गृह मंत्रालय आहे म्हणून कायद्याच्या पुढे कुणीही मोठं नाही. तपास हा सर्व बाजूंनी व्हायला हवा. कुणीही उठून आरोप करेल आणि विरोधीपक्ष राजीनामा मागत बसेल, महाराष्ट्रात या प्रवृत्तीचा बीमोड व्हायला हवं”, असं संजय राऊत म्हणाले.
“महिला अधिकाऱ्याने चौकशी व्हावी, अशी पवारांची सूचना ही इतक्या वर्षाच्या अनुभवातून सूचना दिली आहे. तक्रारदाराच्या वकिलाशी माझा संबंध नाही. धनंजय मुंडे यांना या क्षणी संरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची तटस्थपणे चौकशी होणं गरजेचं आहे”, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका