मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत

| Updated on: Mar 22, 2020 | 12:31 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूबाबत केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut on Janta Curfew).

मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना आज दिवसभर सुरु असलेल्या जनता कर्फ्यूला पाळण्याचं आवाहन केलं आहे (Sanjay Raut on Janta Curfew). मोदींच्या या आवाहनाची खिल्ली उडवू नका. त्यांच्या या आवाहनामध्ये चांगली भावना आहे, असं शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत (Sanjay Raut on Janta Curfew).

संजय राऊत आज ‘सामना’ वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून काम करणार आहेत. राज्य सरकारने सर्व कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. मात्र, संजय राऊत ‘सामाना’च्या कार्यालयात जाऊन काम करत आहेत. याबाबत राऊत यांना विचारले असता ‘सामना’ कार्यालय हेच आपलं घर असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

“सामनातील बहुसंख्य लोकांना सुट्या दिल्या आहेत. त्यांना घरुनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, मी जातोय. कारण माझं घर सामना आहे. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे सामना आहे. तिथे शांतपणे बसून काम करेन. कार्यालयात दुसरं कुणीच नसल्याने मला जावं लागेल. आम्ही गर्दीला मनाई केली आहे. त्यामुळे बहुदा मी कार्यालयात एकटाच असेन. माझ्या घरातील सर्व कुटुंब सदस्य आज त्यांच्या खोलीत क्वारंटाईन आहेत. कुणी घरातून बाहेर पडलेलं नाही”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“अत्यावश्यक सेवा सुरु राहिल्या पाहिजेत. या सेवेत काम करणारे सैनिक आहेत. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. दरम्यान, मुख्यमत्री उद्धव ठाकरे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या संकट काळात ते नेतृत्व करीत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘सामना’च्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. या लेखात त्यांनी कोरोनामुळे धर्म, ईश्वर सर्वच निरोपयोगी झाले, असं म्हटलं आहे.

याबाबत संजय राऊत यांना विचारले असता “‘रोखठोकमध्ये मांडलेला विषय कोणाच्या श्रद्धा दुखावण्याचा प्रश्न नाही. संत गाडगे महाराजांचे विचार आहेत. जेव्हा संकट येतं तेव्हा माणूसच संघर्ष करण्यासाठी उभा राहतो. एकमेकंपासून प्रेरणा घेतो. बाकी देव वैगरे श्रद्धा असतात. धर्माच्या नावावर रक्तपात होताना दिसतात. आपण दिल्लीत पाहिलं. शेवटी धर्म वैगरे किंवा धर्माचे ठेकेदार येत नाहीत. आपण, शास्त्र, आयुर्वेद आणि शास्त्रज्ञ संकटसमयी येतात”, असं मत संजय राऊत यांनी मांडलं.

संबंधित बातम्या :

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर