एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, संजय राऊतांनी पुन्हा नारायण राणेंना डिवचले
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही. (sanjay raut)
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. (sanjay raut raut slams union minister narayan rane)
शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
तेव्हा ते विधान आक्षेपार्ह वाटलं नव्हतं का?
मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी काय म्हटलं मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे. भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं जाहीर करावं, असंही ते म्हणाले.
बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे
गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केलं? या राणेंच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. शिवसेनेचे उपकार मानले पाहिजे. आमच्या सारख्या सामान्य माणसाला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले आहे, असंही ते म्हणाले. (sanjay raut raut slams union minister narayan rane)
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 July 2021 https://t.co/f9lqxn4AoF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2021
संबंधित बातम्या:
जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..
(sanjay raut raut slams union minister narayan rane)