Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल: संजय राऊत

सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. | Sanjay Raut Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांच्या 'सामना'तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 12:31 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सामना दैनिकासाठी कधी मुलाखत देतील, हे लवकरच कळेल, असे वक्तव्य शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. या भेटीनंतर संजय राऊत यांनी ही भेट ‘सामना’तील मुलाखतीसंदर्भात असल्याचे सांगितले होते. (Sanjay Raut reaction about when Devendra Fadnavis will give interview to Saamana newspaper)

मात्र, या भेटीला सहा महिने उलटून गेल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’ला मुलाखत दिलेली नाही. ही मुलाखत कधी होणार, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी फडणवीसांच्या सामनातील मुलाखतीची मुहूर्त लवकरच सुटेल, असे वक्तव्य केले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस ‘सामना’लाही मुलाखत देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

26 सप्टेंबर 2020 रोजी शिवसेना खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. त्यामुळे त्यावेळी या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता. मात्र, ‘टीव्ही 9 मराठी’च्या रिपोर्टरने जेव्हा त्यांना तपशीलवार माहिती दिली. तेव्हा मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो, पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील तर त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितले होते. मात्र, त्याचवेळी दैनिक ‘सामना’मध्ये लवकरच फडणवीस यांची मुलाखत छापून येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.

…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही: संजय राऊत

संजय राऊत यांना सिल्व्हर ओक येथे झालेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी या भेटीमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याचा दावा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.

या भेटीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा कानमंत्र सांगितला असेल का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, होय, शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल. शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली. संबंधित बातम्या:

EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर भेट

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

(Sanjay Raut reaction about when Devendra Fadnavis will give interview to Saamana newspaper)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.