ते कधी राम बनले?, ते तर विभीषण; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल

काल स्मृतीस्थळावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नौटंकी केली. त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, बाळासाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिली. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसले? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं. पण काल ज्यांनी नोटंकी केली, त्यांना शिवसैनिक आम्ही कधीच मांडणार नाही.

ते कधी राम बनले?, ते तर विभीषण; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 12:09 PM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आज आहे. आमचे निष्ठावंत शिवसैनिकच बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाईल. ते कधी राम बनले? ते विभिषण आहेत. विभिषण आपल्या स्वार्थासाठी जेव्हा आला होता तेव्हा प्रभू रामाने त्याचा वापर केला आणि नंतर त्यांना सोडून दिले. त्यांना काय माहीत राम काय आहे? या लोकांना अयोध्या आम्ही पहिल्यांदा दाखविली. उद्धवजी यांच्या नेतृत्वात ते आयोध्येत गेले. आता मुख्यमंत्रीपदावर जोपर्यंत आहेत, तोपर्यंत बीजेपीचे पोपट म्हणून बोलत राहतील, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या राड्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाळासाहेब सर्वांचे आहे. त्यांच्या स्मृती स्थळावर सर्वांनी यावं. अनेक लोक येत असतात. पण काल आलेल्यांनी नौटंकी केली. त्यांना आम्ही शिवसैनिक मानणार नाही. त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल श्रद्धा नाही. भाव नाही. ते फक्त नौटंकी करण्यासाठी आले होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

नौटंकी खपवून घेणार नाही

तुम्ही नौटंकी करता. नौटंकी करणाऱ्याला विरोध झाला. कारण खरा शिवसैनिक अशी नौटंकी खपवून घेणार नाही. खऱ्या शिवसैनिकांनी नौटंकी करणाऱ्यांना त्याने विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे. कुणी काही बोलू द्या. आजचा दिवस पवित्र आणि गंभीर आहे. पण कालचा प्रकार काही लोकांनी केला. निष्ठावंत सैनिकांनी गद्दारांना प्रतिकार केला. हा ट्रेलर आहे. 2024ची तयारी आहे. काल जे आले होते त्यांनी दहा वेळा पक्ष सोडलेला आहे. ते काय निष्ठा शिकवणार?, असा सवाल राऊत यांनी केला.

आगे आगे देखो होता है क्या?

श्रद्धा आणि भाव असता तर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईच्या दारात गुलामी केली नसती. सोडून द्या. काल जे झालं ते ट्रेलर आहे. आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक विधानही त्यांनी केलं. संत तुकडोजी महाराजांच एक अभंग आहे. मनी नाही भाव, देवा मला पाव. देव बाजारचा भाजी पाला नाही रे… तसं यांचं आहे. तुमच्या मनात श्रद्धा नाही, भाव नाही आणि तुम्ही स्मृती स्थळावर येऊन नौटंकी केली, अशी टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेबांमुळेच आम्ही

बाळासाहेब ठाकरे हे देशातल्या समाजकारणातलं महान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर स्वाभिमानाने ताठपणा करून असलेला माणूस आपल्याला दिसला नसता. बाळासाहेब ठाकरे नसते तर जी हिंदुत्वाला जाग आलेली आहे, ज्या राष्ट्रवादीची बात राज्यकर्ते करत आहेत, ती त्यांना कधीच करता आली नसती. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र अखंड ठेवला. आमच्यासारखे असंख्य लोक जे समाजकारणामध्ये काम करत आहेत ते त्यांच्यामुळेच. आम्ही दिल्लीत गेलो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळेच, असं ते म्हणाले.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.