अजितदादा अमित शाह यांना भेटले; संजय राऊत यांची बोचरी टीका; म्हणाले, ही तर नवीच परंपरा…

माझी मागची दिवाळी कुठे होती हे सर्वांना माहीत आहे. जिथे होती तिथे आम्ही आनंदात होतो. संघर्ष होता. पण आम्ही झुकलो नाही याचा आनंद होता. पक्षाची बेईमानी केली नाही याचा आनंद होता. त्यामुळे तीच दिवाळी होती. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहिलो हीच आमची दिवाळी होती. अजूनही आमची संघर्ष करण्याची तयारी आहे, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं.

अजितदादा अमित शाह यांना भेटले; संजय राऊत यांची बोचरी टीका; म्हणाले, ही तर नवीच परंपरा...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 12:33 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अजितदादांना डेंग्यू झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठून शाह यांची भेट घेतली. त्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या भेटीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. अजितदादा आजारी असतानाही अमित शाह यांना भेटले. पूर्वी आजारी माणसांना भेटायला लोक यायचे. आता राज्यात आता नवी परंपरा सुरू झाली आहे. आजारी माणूसच दुसऱ्यांना भेटायला जात आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही टीका केली आहे. अजित पवार यांचं अमित शाह यांना भेटणं हाच एक विनोद आहे. या भेटीनंतर कुणीतरी मला हा विनोद कसा हे सांगितलं. आजारी माणसाला भेटण्याची एक परंपरा आहे. मी आजारी आहे. मला डेंग्यू आहे. मला दिवाळीत त्रास देऊ नका. मला भेटू नका, असं दादा सांगत होते. पण काल पहिल्यांदाच पाहिलं आजारी माणूस दिल्लीत भेटायला गेला. आपल्याकडे लोक येतात, काळजी घ्या म्हणून सांगतात. आजारी माणूस साधारण हालचाल करत नाही. कार्यकर्त्यांना सांगतो, मला भेटू नका. पण तोच आजारी माणूस दुसऱ्यांना भेटतो. आजारी माणूस कुणाला तरी भेटायला जातो ही नवी परंपरा आपल्याकडे सुरू झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आम्ही मुंब्र्यात जातोय

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्र्याला जाणार आहोत. तिथे जाऊन विरोधकांचा नुसता समाचार घेणार नाही तर त्यांच्या छाताडावर पाय देऊन उभं राहणार आहोत. आज संध्याकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व मुंब्र्यात जाणार आहोत. जिथे सत्ता, दहशत आणि पैशाच्या बळावर शाखेवर बुलडोझर फिरवले, जे स्वत:ला शिवसैनिक मानतात पण अफजल खानाची औलाद आहे. असे प्रकार मोगलाईत घडत होते. मोगलाईत महाराष्ट्रात मंदिरं पाडली. लोकांच्या घरादारावरून नांगर फिरवले. ही मोगलाई. मी धर्म किंवा जात म्हणून म्हणत नाही. जे आपल्या भूमिकेला समर्थन देत नाही त्यावर आता बुलडोझर फिरवला जात आहे, असंही राऊत म्हणाले.

तुम्ही कुणाच्या पे रोलवर?

शिवसेनेच्या या शाखेत छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांचा पुतळा आणि फोटो होता. त्यावर बुलडोझर फिरवून मिंधे गटाने आपला डीएनए काय आहे हे दाखवून दिलं. बुलडोझर फिरवला जात असताना पोलिसांना फोन केला तरी तिथे गेले नाही. पोलीस कुणाच्या पे रोलवर आहेत? तुम्ही कोणत्या गटाची चाकरी करत नाही, तुम्ही राज्याची चाकरी करत आहात, असं राऊत म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.