राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं तरी निवडणुका… राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

भाजपने उमेदवार जाहीर केले. काँग्रेसनेही जाहीर केले आहेत. चिंचवडचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक आहे. नाही असं नाही.

राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं तरी निवडणुका... राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 10:38 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं असलं तरी, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक होणार आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवारच आहोत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. तसेच चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजूनही इच्छूक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आवाहन चांगलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. पण या राज्यात घाणेरडं राजकारण कोणी केलं? येथील वातावरण कोणी गढूळ केलं? महाराष्ट्रात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलं? यावरही चिंतन व्हायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सरकारला वातावरण अनुकूल नाही

भाजपने उमेदवार जाहीर केले. काँग्रेसनेही जाहीर केले आहेत. चिंचवडचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक आहे. नाही असं नाही. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निर्णय घेऊ. दोन्ही मतदारसंघातील वातावरण ज्या प्रकारचं आहे. ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. विधान परिषद निवडणुकीने ते दाखवून दिलं. जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट झालंय, असं ते म्हणाले.

वेगळा निकाल लागेल

निवडणूक बिनविरोध करायची आहे तर भाजप का लढवत आहेत? त्यांनी मागे हटाव. पदवीधर निवडणुकीत जे निकाल लागले त्यामुळे सरकार घाबरले आहे. त्यामुळे निवडणूक टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारला वाटतं ही निवडणूक होऊ नये. निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल. ते सत्य आहे.

दोन्ही मतदारसंघातील निकाल वेगळा लागू शकतो. असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतंय. म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे. आम्ही सर्व्हे केला. आम्हाला आमच्या भूमिका लोकांना स्पष्ट करायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

बदल होणार नाही

शिक्षक आणि पदवीधरांनी जो निर्णय दिला तोच कसबा आणि चिंचवडला शंभर टक्के लागू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं तरी, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी निवडणुका होतील. त्यात बदल होणार नाही, असं ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.