Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | अखेर संजय राऊत यांची जेलमधून जामिनावर सुटका

शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत आज अखेर तीन महिन्यांनी जेलमधून बाहेर आले आहेत.

Sanjay Raut | अखेर संजय राऊत यांची जेलमधून जामिनावर सुटका
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 6:50 PM

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत आज अखेर तीन महिन्यांनी जेलमधून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी ईडीने त्यांना गेल्या तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. अखेर 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता झालीय. संजय राऊत आणि शिवसेना या दोन्हींसाठी गेले तीन महिने किती खडतर होते याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. संजय राऊतांच्या जामीनामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात नवचैतन्य संचारलं आहे. मुख्य शिवसेनेमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे. शेकडो कार्यकर्ते संजय राऊतांच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर जमले आहेत.

संजय राऊत यांना आज विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या जामीनाचे कागदपत्रे आणि रिलीज ऑर्डर ऑर्थर रोड कारागृहाबाहेर असलेल्या पेटीत साडेपाच वाजेआधी टाकण्यात आले होते. त्यानंतर साडेपाचला ही पेटी उघडली. नंतर रिलीजची सर्व प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानंतर दीड-दोन तासांनी संजय राऊतांचे कपडे आणि इतर सामान जेलमाधून बाहेर आणण्यात आलं. ते सामान त्यांच्या गाडीत ठेवण्यात आलं. त्यानंतर थोड्यावेळाने संजय राऊत आर्थर रोड कारागृहाबाहेर आले.

संजय राऊत यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांना आज विशेष पीएमएलए कोर्टाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांच्या जामीनाला विरोध केला. पण कोर्टाने त्यांचा विरोध फेटाळत संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. संजय राऊत हे लोकप्रतिनिधी आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत. असं असताना गेल्या 102 दिवसांपासून ते जेलमध्ये होते.

विशेष म्हणजे विशेष पीएलए कोर्टाने आपल्या जामीन ऑर्डरमध्ये ईडीबद्दल मोठे खुलासे केले आहेत. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर होती, असं स्पष्ट विशेष पीएलए कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे. ईडीने प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक केली नाही.अनेक साक्षीदारांच्या जबाबातून वाधवान यांची मुख्य भूमिका समोर येतेय. मात्र प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली, असं ऑर्डरमध्ये कोर्टाने म्हटलं आहे.

“या प्रकरणातील म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटतेय. तरीही म्हाडाचा कुठलाही आरोप कर्मचारी आरोपी नाही. जबाबदार एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही”, असंही ऑर्डरमध्ये म्हटलं आहे.

ईडीची हायकोर्टात धाव

विशेष पीएमएलए कोर्टाकडून संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीचे वकील हे मुंबई हायकोर्टात दाखल झाले. तिथे त्यांनी विशेष पीएमएलए कोर्टाच्या जामीनाच्या निर्णयाला आव्हान दिलं. ईडीच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाकडे तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली. पण हायकोर्टाने वेळेचं कारण सांगत उद्या सुनावणी घेऊ असं सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी हायकोर्टाने ईडीचे कानही टोचले. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे, असं हायकोर्टदेखील पीएमएलए कोर्टाची ऑर्डर वाचून म्हणाले. त्यामुळे संजय राऊतांचा जामीनाला स्थगिती देण्याची ईडीची विनंती मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.

शिवसैनिकांचा राज्यभरात जल्लोष

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष केला जातोय. मुंबईपासून ते संभाजीनगरपर्यंत शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे आर्थर रोड कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली. इथून मोठी रॅली काढण्यात आलीय. संजय राऊत सर्वात आधी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करणार. त्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.