मुंबई : राज्यात आज सकाळचा दिवस उजाडल्यापासूनच खळबळ माजलीय. सकाळी चौकशी सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत तर नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाली. त्यानंतर दोन्ही बाजुंच्या नेत्यांचे ट्विटवर ट्विट यायला लागले. आता एवढा पॉलिटिकल राडा सुरू असताना, शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत (Sanjay Raut) कसे गप्प बसतील. उशीरा का होईना पण संजय राऊत गरजलेच. संजय राऊतांनीही ट्विट करत भाजपला थेट अफजलखानाची उपमा दिली आहे. तर हिंदूत्व काय आहे. हेही सांगितलं आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांचा महाविकास आघाडी राजीनामा घेण्याची शक्यता आहे. तर नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका असा सल्लाही राऊतांनी दिलाय. आता राऊतांचा हा सल्ला पवार (Sharad pawar) किती ऐकताहेत हेही पाहणं तेवढेच महत्वाचे आहे. पण सध्या राजकीय हलचालींना वेग आलाय.
संजय राऊतांचे ट्विट
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू.
कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2022
मलिकांना अटक केल्यानंतर राऊतांनी ट्विट करत, महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू.कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे..
जय महाराष्ट्र! म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेत्यांनीही ट्विटची मालिका सुरू केली आहे.
अतुल भातखळकरांचे ट्विट
मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून NCP आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 23, 2022
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे ट्विट
ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. MVA ची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 23, 2022