देणगीचं नागरिकांना आवाहन हा बहाणा, तो उद्योगपतींना इशारा, टाटांनी देखील भाजपला देणगी दिलीय, संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपसाठी देणगी देण्याचं आवाहन, देशातील पाच राज्यांच्या निवडणुका आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. महाराष्ट्राबद्दल चांगलं घडलं की विरोधी पक्ष नाराज होतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

देणगीचं नागरिकांना आवाहन हा बहाणा, तो उद्योगपतींना इशारा, टाटांनी देखील भाजपला देणगी दिलीय, संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 11:01 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपसाठी देणगी देण्याचं आवाहन, देशातील पाच राज्यांच्या निवडणुका आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. महाराष्ट्राबद्दल चांगलं घडलं की विरोधी पक्ष नाराज होतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सामान्य जनतेला आवाहन हा बहाणा, तो उद्योगपतींना इशारा

देणग्या आम्हालाच द्या, इतरांना देऊ नका हा संदेश आहे.सामान्य जनतेला आवाहन असलं तरी बहाणा आहे. मात्र हा उद्योपतींसाठी संदेश आहे. भाजपला देणग्या टाटांपासून सर्वांनी दिलेल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी देणग्या द्या असं सांगण योग्य नाही त्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात, पण मी घेणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपला पैसे देऊन देश मजबूत कसा होणार?

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरुन संभ्रम आहे. भाजपला देणगी देऊन देश मजबूत कसा होणार, असा सवाल असल्याचं संजय राऊत म्हणाले. कायद्यानुसार देणगी मागितली जाऊ शकते मात्र प्रधानमंत्र्यांनी पक्षाला देणगी मागणं हे नैतिकतेला धरुन नाही. प्रधानमंत्री सहाय्यता निधीला पैसे मागण्याऐवजी पीएम केअरला जो खासगी ट्रस्ट आहे त्यासाठी मागितले आता भाजपसाठी देणगी मागितली आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आहेत त्यांनी देणग्या मागितल्या तर ते ठीक होतं. मात्र, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल,मुख्यमंत्री यांनी पक्षासाठी योग्य नाही. संपूर्ण जगात अशी गोष्ट कोण करत नाही, मात्र आपल्या प्रधानमंत्र्यांनी केली आहे, असं संजय राऊथ म्हणाले.

आम्हाला पैसे द्या विरोधकांना पैसे देऊ नका हा संदेश आहे, दुसऱ्यांना पैसे दिल्यास आम्ही लक्ष देऊ, असा अप्रत्यक्ष इशारा असल्याचं राऊत म्हणाले. तुम्ही भाजपचे सदस्य आहात पण देशाचे प्रधानमंत्री आहात हे पाहयला हवं, असं संजय राऊत म्हणाले.

राज्याबद्दल चांगलं घडलं की विरोधक नाराज

महाराष्ट्राच्या बाबतीत काही चांगलं घडलं की राज्यातला विरोधी पक्ष नाराज होतो. हा आजार होतो. त्यावर उपचार करण्यासंदर्भात आम्ही विचार करतोय.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना अभ्यास करण्याची सवय

शांतता, अभ्यास सुरु आहे ,हे नाटक राजभवनात सुरु आहे. त्या नाटकात एकटे राज्यपाल नसून भाजपचे काही लोकही असल्याचं संजय राऊत म्हणाले. बारा विधानपरिषद आमदारांविषयी ते अभ्यास करत आहेत. एका वर्षापासून अभ्यास सुरु आहे तो अजून किती वेळ चालणार आहे. राज्यपालांवर कॅबिनेटनं घेतलेले निर्णय बंधनकारक आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबतही इतका अभ्यास करणं बरोबर नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

इतर बातम्या:

नितेश राणे का उसमे कोई भी योगदान नही है, सिंधुदुर्गातल्या राड्यावर राणेंचं वक्व्य, नितेश अज्ञातवासात?

Video : आता वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला? भाजपकडून व्हिडीओ ट्विट, उपाध्ये म्हणतात, ठाकरे काय अ‍ॅक्शन घेणार?

Sanjay Raut slam Narendra Modi and BJP for Donation collection Drive and also take jibe of Maharashtra BJP Leaders

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.