शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला इशारा
भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. (shivsena bhavan)
मुंबई: भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. (sanjay raut slams bjp over agitation at shivsena bhavan)
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं केंद्रबिंदू आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुमचा शिक्षणाशी काही गंध आहे का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल राऊत यांनी केला.
माहिती विचारणे गुन्हा आहे का?
आम्ही भाजपवर कुठेच थेट आरोप केलेला नाही. हा घोटाळा भाजपने केला असं म्हटलं नाही. राम मंदिरासाठीची ट्रस्ट स्वायत्त आहे. त्यातील सदस्य कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तरीही तुम्ही टीका करता, ट्रस्टमध्ये काय भाजपची माणसं आहेत का? ट्रस्टला जर काही प्रश्न विचारले तर त्यांनी त्याचा खुलासा करू नये का? या देशात माहिती विचारणे हा गुन्हा आहे का?; असा सवाल त्यांनी केला. काल हल्ला करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. मला वाटतं हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे. त्यांनी शिवभोजन देण्याची वेळ आणू नका, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
आरक्षणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवा
आज खासदार संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, या मताचे हे दोन्ही नेते आहेत. अशी चर्चा झाली पाहिजे. शेवटी चर्चेतूनच मार्ग सुटू शकतो, असं सांगतानाच आरक्षण हा मुद्दा नाजूक आहे. प्रत्येक जात समूह आरक्षण मागत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण ठरवावं लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.
त्या विषयी माहीत नाही, कसे बोलणार?
दरम्यान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने ताब्यात घेतलं आहे. त्यावर बोलण्यास राऊत यांनी नकार दिला. पोलिसी कारवाई असेल. मला माहीत नाही, या संदर्भात गृहमंत्री, पोलीस आयुक्त बोलू शकतील, त्या विषयी मला माहीत नाही, मी कसे बोलणार?, असं ते म्हणाले. (sanjay raut slams bjp over agitation at shivsena bhavan)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 17 June 2021https://t.co/01P77NuPay
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या:
शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!
शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, सेना भवनसमोर राडा; अनेकांची धरपकड!
(sanjay raut slams bjp over agitation at shivsena bhavan)