पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू; संजय राऊत यांचा ‘रोखठोक’मधून ‘या’ मुद्द्यांवर हल्लाबोल

भाजप हा अहंकर आणि उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे. त्या टोकावरून त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. भ्रष्टाचार करूनही अदानीला वाचवणारे सरकार मात्र काश्मिरी पंडितांना वाचवत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू; संजय राऊत यांचा 'रोखठोक'मधून 'या' मुद्द्यांवर हल्लाबोल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 8:32 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरु आहेत. देशातील अंतर्गत प्रकरणावर मोदी काहीच बोलत नाहीत. या गोष्टींकडे त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. काश्मिरात पंडितांच्या हत्या सुरू आहेत. पंजाबात खलिस्तांनी खदखद उफाळून येत आहे. अंधभक्तांचे विश्वगुरु मात्र त्यावर मौन पाळून आहेत, अशी टीका करतानाच अंधभक्तांच्या देशभक्तीवर संशय निर्माण करणे हा देशद्रोहासारखा गुन्हा ठरत आहे. देशातील गोंधळ भयंकर आहे. हे सर्व कधी थांबणार? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून त्यांनी हा सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये काश्मिरी पंडितांची वेदना आणि पंजाबमधील खलिस्तान्यांची खदखद या मुद्द्याला हात घातला आहे. तसेच या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन असल्याने त्यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचे दोन दिवस नाट्य रंगवून काश्मिरी पंडितांच्या आक्रोशावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे बेईमानी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मोदी-शाह यांचे सरकार आम्हाला जबरदस्तीने काश्मीर खोऱ्यात पाठवत आहे. आमच्या जीवाची हमी घ्यायला तयार नाही. त्यांच्या राजकारणासाठी आम्ही किती वेळा रक्त सांडवायचे? असा सवाल येथील काश्मिरी पंडित करत असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

काश्मिरी पंडितांना काय मिळालं?

370 कलम हटवून काश्मिरी पंडितांना काय मिळालं? याचं उत्तर भाजपचा एकही बडा नेता देऊ शकला नाही. हे कलम हटवूनही मोदी-शाह पंडितांचे रक्षण करू शकले नाहीत. उलट हे कलम हटवल्यानंतर त्याचं राजकारणच अधिक करण्यात आलं आहे. काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायाचे रक्षण करण्यात भाजप सपशेल अपयशी ठरला आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

लव्ह जिहादसाठी मोर्चे, मग काश्मिरी पंडितांसाठी का नाही?

भाजप हा अहंकर आणि उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे. त्या टोकावरून त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. भ्रष्टाचार करूनही अदानीला वाचवणारे सरकार मात्र काश्मिरी पंडितांना वाचवत नाही. लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू आक्रोश मोर्चे काढले जात आहे. तसेच सकल हिंदूंचे आक्रोश मोर्चे काश्मिरी पंडितांसाठी का निघत नाही? असा रोखठोक सवालही करण्यात आला आहे.

प्रिय ईडी, सीबीआयने हिंमत दाखवावी

पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तांनी चळवळ सुरू झाली आहे. अमृतपाल सिंह यांने हिंसा घडवून आणलीय. त्याला एवढा पैसा कुठून येतो? कोण पुरवतो पैसा? याचा शोध घेण्याची हिंमत मोदी-शाह यांच्या प्रिय ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सने दाखवावी. सिसोदियांना अटक होते. मग पंजाब खलिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांचा गळा का आवळला जात नाही? मोदी-शाह गप्प कसे? राज्यांच्या प्रश्न म्हणून राज्यांवर ढकलून चालणार नाही. काश्मीर आणि पंजाबसारख्या दोन्ही सीमावर्ती भागात कधीही आग लागेल अशी स्थिती आहे. पण दिल्लीचे निरो फक्त देशभक्तीची बाजरी वाजवीत आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.