उद्यापर्यंत समजेल विरोधक काय करतात ते, संजय राऊत यांचा सूचक इशारा; कोणता मोठा निर्णय होणार?

राज्यपालांना हटवण्याबाबत राष्ट्रपती काही करणार नाही. ते फक्त पत्राची पोच देतात. कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीच करायला हवी. सध्या सर्व संस्थांची अवस्था सर्वांना माहीत आहे.

उद्यापर्यंत समजेल विरोधक काय करतात ते, संजय राऊत यांचा सूचक इशारा; कोणता मोठा निर्णय होणार?
उद्यापर्यंत समजेल विरोध काय करतात ते, संजय राऊत यांचा सूचक इशारा; कोणता मोठा निर्णय होणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 12:07 PM

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: कर्नाटकाच्या आरेरावी विरोधात भाजप फक्त आरेला कारे देण्याची भाषा करत आहेत. तिकडे कर्नाटक महाराष्ट्रात घुसले आहे. भाजप फक्त इशारे देत आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावरच आहे. तुम्हाला उद्यापर्यंत कळेल विरोधक काय करतात ते, असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. त्यामुळे उद्या विरोधी पक्षाकडून कोणता मोठा निर्णय जाहीर होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं म्हटलं होतं. लाड यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनीही लाड यांच्या या विधानाचा समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

कोण प्रसाद लाड? सोड रे… ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपमधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतू माधव पगडी किंवा इतिहासकार यदुनाथ सरकार आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

या भाजपचं डोकं फिरलंय. शिवाजी महाराजांची शक्ती आहे ना, ही शक्तीच यांना खतम करेल. जी भवानी तलवार आहे महाराजांची ही तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटेल. रोज कोणी तरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफझल खान आणि औरंगजेब येत असेल आणि यांच्या कानात एक मंत्र देत असेल. त्यामुळेच हे लोक बरळत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे? महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांचं महानिर्वाण कुठे झालं? हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहीत आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. रायगडावर त्यांची समाधी आहे. तुम्ही नवीन नवीन शोध का लावत आहात? भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे का? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी जसं नीती आयोग स्थापन करून त्यावर आपल्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपने नवीन इतिहास संसोधन मंडळ निर्माण करून लाड, द्वाडांची नेमणूक केलीय का? ते महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार आहेत का? कठीण आहे, असा संतापत त्यांनी व्यक्त केला.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे. ज्या ठिकाणी दोन्ही नेते जाणार आहेत, तिथेच कर्नाटकाने पोस्टर लावली आहेत. त्यावरूनही संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. हे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान आहे. सरकारला दिलेलं आव्हान आहे. महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे, असं ते म्हणाले.

भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणतात, कर्नाटकाच्या आरेला कारेनं उत्तर देऊ. अरे आरे वाल्यांनो आणि कारे वाल्यांनो कर्नाटक घुसलं आतमध्ये. तुम्ही कधी कारे करणार? नागपूरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोबाडावर त्यांनी पोस्टर चिटकवले आहेत.

कोणी म्हणतंय गुजरातला येऊन बघा. कोणी म्हणतंय कर्नाटकाला येऊन बघा. कुठे आहे महाराष्ट्र तुमचा. चुल्लूभर पानी में डुब जाव. तशी तुमच्यावर वेळ आली आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी विरोधी पक्षांवर आहे. तुम्हाला उद्यापर्यंत समजेल विरोधी पक्ष काय करतो ते, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपालांना हटवण्याबाबत राष्ट्रपती काही करणार नाही. ते फक्त पत्राची पोच देतात. कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीच करायला हवी. सध्या सर्व संस्थांची अवस्था सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राची जनता हीच ताकद आहे.

उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजी राजे असतील ते आपल्या पद्धतीने जागरुकता निर्माण करत आहे. विरोधी पक्षही आपली भूमिका उद्या किंवा परवाच भूमिका जाहीर करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.