शिवसेनेच्या विरोधात भाजपचे ते ‘तीन’ कोण? राऊतांच्या टार्गेवर ईडी
"नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही", असा इशारा संजय राऊत यांनी दिला (Sanjay Raut slams BJP over Varsha Raut summons by ED)
मुंबई : “ईडी दीड महीन्यांपासून आम्हाला पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी माहीती पाहीजे होती ती आम्ही दिली आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याबाबात कोणताही संदर्भ दिला नाही तरीसुद्धा भाजपची माकडं उडी मारत आहेत. यांची ईडी बरोबर हात मिळवणी आहे का? गेल्या तीन महीन्यांपासून ईडी कार्यालयावर माझं लक्ष आहे. भाजपची तीन लोकं सतत ईडी कार्यालयात जात आहेत तेथून ते कागदपत्रे घेऊन येत आहेत”, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला (Sanjay Raut slams BJP over Varsha Raut summons by ED).
शिवसेनेते नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बाजवले आहेत. ईडीच्या या नोटीसवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येवून अटक करुन घेऊन जा. नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा. जर हे करणार असाल तर खुशाल करा. ईडी, सीबीआयने ते करावं किंवा आमच्याविरोधात बाहेर कुणी दहशतवादी गँग असेल त्यांनी ते करावं. आम्ही हटणार नाहीत. या सरकारचा बालही बाका होणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“माझ्या पत्नीच्या नावावर बारा वर्षांपूर्वीचा एक व्यवहार आहे. बारा वर्षांनी सरकारला जाग आली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातलं एका शिक्षिका असलेल्या मराठी महिलेनं एक घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलं, त्यासंदर्बात ईडीला दहा वर्षांनी जाग आली”, असं संजय राऊत यांनी सांगितलं (Sanjay Raut slams BJP over Varsha Raut summons by ED).
संबंधित बातमी : ईडीचा धाक दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव; राऊतांचा मोठा आरोप