AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे हिमालय, कुठे टेकाड, टेंगूळ; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (sanjay raut slams chandrakant patil over his statement on sharad pawar)

कुठे हिमालय, कुठे टेकाड, टेंगूळ; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका
sanjay raut
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 12:36 PM

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तुम्ही शरद पवारांचा एकेरी उल्लेख करता. कुठे हिमालय आणि कुठे टेकाड, टेंगूळ? अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. चंद्रकांतदादांनी पवारांचा एकेरी उल्लेख केला. शोभतं का हे त्यांना. कुठे हिमालय आणि कुठे टेकाड, टेंगूळ. तुम्हाला बोलायचंच आहे तर अतिरेक्यांसदर्भात बोला. त्यांना दम द्या. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.

मंत्र्यांना आवाहन

भाजपकडून राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्यावरूनही त्यांनी थेट राज्यातील मंत्र्यांनाच भाजपविरोधात दंड थोपाटण्याचं आवाहन केलं. नुसते खूर्च्यांवर बसू नका. प्रति हल्ला करा. हल्ल्याला हल्ला टोल्याला टोला द्या. माझं सर्वच मंत्र्यांना हे आवाहन आहे. तसं केल्यावरच हे आठ दिवसात पळून जातील, असंही ते म्हणाले.

कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्याच्या भाषणावर विरोधकांनी टीका केली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. दसऱ्याच्या भाषणावर टीका करू द्या. कमी प्रतीचा गांजा मारल्यावर असं होतं. ते कमी प्रतीचा गांजा मारतात. त्यामुळे त्यांना अशा आयडिया सूचतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने खरं खरं सांगितलं!

उत्तराखंड भाजपमध्ये भूकंप, सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेस नेत्याचा दावा

(sanjay raut slams chandrakant patil over his statement on sharad pawar)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.