Maharashtra-Karnataka Border Dispute | असे येडे बरळत असतात; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना राऊतांनी झापले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना फटकारले आहे. (sanjay raut slams Laxman Savadi over Maharashtra-Karnataka Border Dispute)

Maharashtra-Karnataka Border Dispute | असे येडे बरळत असतात; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना राऊतांनी झापले
संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 10:52 AM

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना फटकारले आहे. असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (sanjay raut slams Laxman Savadi over Maharashtra-Karnataka Border Dispute)

बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवदी यांच्यावर टीका केली. असे येडे बरळतच असतात, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. तर दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मुंबईतील कानडींवर आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांच्या शाळाही इथे आम्ही चालवतो. त्यांच्या संस्थाही महाराष्ट्रात चालतता. तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे सवाल करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, असंही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे हे लक्षात घ्या

काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ही निर्णायक बैठक होती. त्यामुळे कोणी काही बरळलं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, असं सांगतानाच बेळगाव महाराष्ट्रात आलाच पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत हे कर्नाटक सरकारने लक्षात घ्यावं, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपच्या नेतृत्वातील गट आंदोलनात घुसला

यावेळी राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. केंद्र सरकारने दडपशाही सुरू केली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले. ते कोण होते? त्यांना कुणाची फूस होती? याचा शोध घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आणि त्यात फूट पाडण्यासाठी हे षडयंत्र होतं असं वाटत आहे. भाजपच्या नेतृत्वातील गट या आंदोलनात घुसला होता. त्यामुळे आंदोलनात फूट पडल्याचं आज चित्रं दिसत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे राज्याच्या हिताचा अजेंडा राबवत आहेत

शिवसेना आपला अजेंडा राबवत असल्याची टीका होत आहे. शिवसेनेने आपला अजेंडा राबवला तर चुकलं कुठं? देशात सहा सात वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे ते कुणाचा अजेंडा राबवत आहेत? कशा प्रकारे अजेंडा राबवत आहेत? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विकास कामांचं श्रेय कोण घेत आहे? आम्ही काय अजेंडा राबवावा हे आम्हाला कोणी सांगू नये, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र हिताचाच अजेंडा राबवत आहेत, असं राऊत म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जसे देशाचे होते, तसेच बाळासाहेब ठाकरे सुद्धा देशाचे होते. एखाद्या प्रकल्पाला त्यांचं नाव दिलं म्हणजे शिवसेनेने आपला अजेंडा राबवला असं होत नाही, असंही ते म्हणाले. (sanjay raut slams Laxman Savadi over Maharashtra-Karnataka Border Dispute)

निलेंगेकराच्या प्रश्नावर मौन

दरम्यान, लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्यात विधानसभेला प्रचंड मोठ्या फिक्सिंगचा गौप्यस्फोट केलाय. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सुचित केलंय. त्याबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला. (sanjay raut slams Laxman Savadi over Maharashtra-Karnataka Border Dispute)

संबंधित बातम्या:

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

निलंगेकर म्हणतात, लातुरात लोकशाहीचा खून! ठाकरे, फडणवीस, देशमुखांकडे अप्रत्यक्ष बोट, राजकीय ‘फिक्सिंग’चा गौप्यस्फोट !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर नि:पक्षपाती भूमिका घ्या; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.