बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार; राऊतांची खोचक टीका

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. (sanjay raut taunt bjp over Shinzo Abe awarded Padma Vibhushan)

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार; राऊतांची खोचक टीका
पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते.
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 11:13 AM

मुंबई: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो, असं सांगतानाच बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. (sanjay raut taunt bjp over Shinzo Abe awarded Padma Vibhushan)

संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. इतकं मोठं राज्य आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ 6 लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे. इतर राज्यातील नावं पाहिली आहे. राज्यातील 10 ते 12 लोकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यता येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता? ही नावं पाहून मला आश्चर्य वाटलं, असं राऊत म्हणाले.

नावं तपासावी लागतील

ज्या सहा लोकांना पुरस्कार देण्यात आले. त्यांची नावं राज्य सरकारच्या यादीत होती की नाही, हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले. राज्य सरकारकडून काही नावांची शिफारस केली जाते. मला वाटतं त्यातलं एकही नाव पुरस्कार मिळालेल्यांमध्ये नसेल, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राने बुलेट ट्रेन नाकारली

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार दिल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यावर बुलेट ट्रेन दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असावा. महाराष्ट्राने जी बुलेट ट्रेन नाकारली, त्यासाठीच हा पुरस्कार असावा, असा टोलाही त्यांनी लगावला. (sanjay raut taunt bjp over Shinzo Abe awarded Padma Vibhushan)

राऊतांचे नाव नाही

दरम्यान, ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचंही नाव होतं. ‘सिरम’चे अदर पूनावाला, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावं पाठवली होती. मात्र केंद्राने केवळ एकाच व्यक्तीची निवड केली असून इतर 97 जणांना प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. (sanjay raut taunt bjp over Shinzo Abe awarded Padma Vibhushan)

संबंधित बातम्या:

72 Republic Day LIVE UPDATES | राजपथावर पथसंचलनाला सुरुवात, ब्लॅक कमांडोजला पाहून उत्साह वाढला

ठाकरे सरकारकडून 100 नावांची शिफारस, मिळाला फक्त एक पद्म, राऊतांनाही नाही !

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलिसांना भोवळ; तात्काळ रुग्णालयात दाखल

(sanjay raut taunt bjp over Shinzo Abe awarded Padma Vibhushan)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.