राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! राजभवनाची खिंड पडली… संजय राऊत यांचं सूचक ट्विट
राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढूच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चोहोबाजूंनी घेरले गेले आहेत. राज्यपालांच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने महाराष्ट्र बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्या शिवाय माजी खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत:हून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त आहे. हे वृत्त येताच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढूच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र! pic.twitter.com/MK1rWbhzcA
हे सुद्धा वाचा— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा दर्शवल्याच्या बातम्या येताच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात शिवाजी महाराजांना जुने आदर्श म्हटलं होतं. तसेच शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी तुलना केली होती. त्यामुळे वादंग उठलं होतं. विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्यपालांना धारेवर धरलं होतं.
तसेच मराठा संघटनांनीही जागोजागी आंदोलने करून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांच्या राजनाम्याची मागणी करतानाच महाराष्ट्र बंदचे संकेतही दिले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींची चांगलीच गोची झाली होती.
त्यानंतर राज्यपाल कोश्यारी अचानक दिल्लीत गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतरही महाराष्ट्रातील आंदोलने न थांबल्याने अखेर राज्यपालांनी पदमुक्त होण्याची निकटवर्तीयांकडे इच्छा वर्तवल्याचं सांगितलं जातं.