Sanjay Raut : शिवसेनेची मुलखमैदानी तोफ आज अयोध्येत, युवराजांच्या दौऱ्याआधी राऊत उद्या करणार पाहणी
मध्येच राज्यसभेच्या निवडणुका लागल्याने या दौऱ्याची तारीख थोडी पुढे ढकलण्यात आली. हा दौरा 15 जूनवर गेला आहे. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र त्याआधी संजय राऊत उद्या अयोध्येत दाखल होऊन आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी पाहणी करणार आहेत.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवासांपासून दोन अयोध्या दौरे (Ayodhya Visit) बरेच गाजले. त्यातला एक अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झाला तर दुसरा अयोध्या दौरा आता 15 जूनला होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातून अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्याच्यापाठोपाठ शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याही अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली. मात्र राज ठाकरेंच्या दौऱ्याला ब्रृजभूष सिंह यांचा कडाडून विरोध झाला. त्यामुळे राज ठाकरे यांना हा दौरा तुर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली. तसेच पुण्यात सभा घेत याबाबत स्पष्टीकरणही दिलं. मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला कुठलाही अडथळ नव्हता. मात्र मध्येच राज्यसभेच्या निवडणुका लागल्याने या दौऱ्याची तारीख थोडी पुढे ढकलण्यात आली. हा दौरा 15 जूनवर गेला आहे. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र त्याआधी संजय राऊत उद्या अयोध्येत दाखल होऊन आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी पाहणी करणार आहेत.
हे आमचे राजकीय शक्तिप्रदर्शन नाही
उद्या सकाळी संजय राऊत अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर काही दिवसातच शरयू नदीच्या कनदीकाठावर आदित्य ठाकरे महाआरती करणार आहेत. या दौऱ्याबाबत संजय राऊतांना विचारले असता संजय राऊत म्हणाले, संध्यकाळी आम्ही अयोद्धेला जात आहोत…मी, एकनाथ शिंगे, वरुण सरदेसाई असे आम्ही 15 जण अयोध्येला जात आहोत. आम्ही 15 जूनच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरता आज अयोध्येसाठी निघणार आहोत. अयोद्धा दौरा हे आमचे राजकिय शक्तीप्रदर्शन नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे. तर 15 तारखेला आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू किनारी आरती करतील, अशी थोडक्यात माहिती राऊतांनी आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत दिली आहे.
काश्मिरी पंडितांकडे बघायला वेळ नाही का?
तसेच यावेळी संजय राऊतांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या काश्मिरची स्थिती नियंत्रणाबाहेर आहे. कधी काश्मिर फाईलचं प्रमोशन होतं, कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतं मात्र काश्मिरी पंडीतांच्या दु:खाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. काश्मिरी पंडीतांचं पलायन आणि हत्या याबाबत शिवसेना पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडीतांच्या बाजुनं उभी राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं काश्मिरी पंडीतांच्या बाजुनं उभं राहील. मात्र तुम्ही शिवलींग शोधताय पण काश्मिरी पंडीतांचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच योगींच्या वाढदिवसनिमीत्त आमच्या शुभेच्छा, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.