संजय राऊत यांची सुरक्षा काढली, आता राऊत म्हणतात, माझ्या जीवाला…
सुरक्षा नाही म्हणून आम्ही काम करणं बंद करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई – जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची सुरक्षा सरकारकडून हटविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारनं महाविकास आघाडीतील काही नेत्यांची सुरक्षा हटविली. त्यात संजय राऊत यांचाही समावेश होता. मात्र, त्यावेळी राऊत तुरुंगात होते. निर्णयाची अमलबजावणी सुरू झाली. त्यामुळं जीवाला काही बरवाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले, सरकारला माहीत असतानासुद्धा सुरक्षा काढली. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळतंय. चालू द्या. आमच्या जीवाला काही बरंवाईट झालं तर सरकार जबाबदार राहील. हे सूडबुद्धीनं केलेलं आहे. सुरक्षा नाही म्हणून आम्ही काम करणं बंद करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सुरक्षा राज्य सरकार कधीही काढत नाही. यासंदर्भात गृह विभागाची समिती अहवाल सादर करते. मुख्य सचिव त्यावर निर्णय़ करतात. माझी सुरक्षा काढली तेव्हा याच मोठ-मोठ्या नेत्यांनी माझं सामान्य ज्ञान वाढविलं होतं. हे सामान्य ज्ञान सर्वच पक्षांच्या नेत्यांसोबत राहू द्या.
याआधी संजय राऊत यांना वाय प्लस सुरक्षा होती. त्यास एक एक्सकार्ट वाहनं, चार पोलीस कर्मचारी व एक पोलीस अधिकारी सदैव राऊत यांच्या सुरक्षेत तैनात असायचे. ही संपूर्ण सुरक्षा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळं सरकार माझ्या जीवाशी खेळत असल्याचा आऱोप राऊत यांनी केलाय.